जमिनीच्या वादातून गोळीबार? अछामपेटचे CPI नेते चंदू राठोड यांची हत्या
.jpeg)
हैदराबाद :
राजकीय वर्तुळात खळबळ उडवणाऱ्या घटनेत सीपीआय (एमएल) नेते चंदू
राठोड यांची आज सकाळी गोळ्या घालून हत्या करण्यात आली. ही घटना मलकपेट येथील
शालिवाहन नगरमध्ये सकाळी ७.३० च्या सुमारास घडली. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या
माहितीनुसार, “तीन ते चार
हल्लेखोर एका पांढऱ्या स्विफ्ट कारमधून आले. त्यांनी प्रथम राठोड यांच्या
चेहऱ्यावर मिरची पावडर फेकली. राठोड पळून जाण्याचा प्रयत्न करत असताना त्यांच्यावर
अनेक गोळ्या झाडण्यात आल्या. त्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला.”
पूर्वीही मिळत होत्या धमक्या
राठोड यांना यापूर्वी धमक्या मिळत असल्याची माहिती समोर आली आहे.
आग्नेय विभागाचे डीसीपी एस. चैतन्य कुमार यांनी सांगितले की, “प्राथमिक तपासात ही हत्या वैयक्तिक वैमनस्यातून झाल्याचे दिसते.” तसेच,
जमिनीच्या वादातून ही हत्या झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला
आहे. सीपीआयचे राष्ट्रीय नेते के. नारायण
यांनी याला वैयक्तिक शत्रुत्व असल्याचे म्हटले, तरी हे राजकीय षड्यंत्र असण्याची शक्यता
त्यांनी नाकारली नाही.
घटनास्थळावर तणावाचे वातावरण
गोळीबार होताच उद्यानात उपस्थित असलेले इतर लोक घाबरून पळाले.
मलकपेट पोलिसांनी घटनास्थळ गाठून पुरावे गोळा करण्यास सुरुवात केली आहे. पोलिसांनी
भारतीय दंड विधानाच्या कलम ३०२ आणि शस्त्रास्त्र कायद्यानुसार गुन्हा दाखल केला
आहे. मृत चंदू राठोड हे कुर्नूल
जिल्ह्यातील अछामपेट येथील रहिवासी होते.
हल्लेखोरांचा शोध सुरू
या घटनेमागे नेमके कोण आहे, याचा तपास सुरु
असून पोलिसांकडून परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली जात आहे.