यूपीमध्ये धक्कादायक घटना : भाजपा खासदाराच्या बहिणीला सासरे व दीरांकडून भररस्त्यात मारहाण, व्हिडिओ व्हायरल

भाजपा खासदार मुकेश राजपूत यांच्या बहिणीवर कासगंज
येथे तिच्या सासऱ्यांनी आणि दोन दीरांनी भररस्त्यात हल्ला केला. काठी, लोखंडी रॉड आणि चाकूने केलेली ही मारहाण सोशल मीडियावर व्हायरल झाली असून
प्रकरणाने खळबळ उडवली आहे.
काय घडलं?
- पीडिता रिना सिंह
अंघोळ करत असताना तिचे सासरे लक्ष्मण सिंह आणि दीर गिरीश सिंह यांनी
तिचा व्हिडिओ बनवल्याचा आरोप आहे.
- विरोध करताच तिला
शिवीगाळ करण्यात आली.
- त्यानंतर सासऱ्यांनी
रायफल आणून जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप.
- पळण्याचा प्रयत्न
करताना दुसऱ्या दीर राजेशकडून चाकूचा हल्ला, तसेच लोखंडी रॉडने मारहाण.
- घराबाहेर खेचून आणून
केस ओढत, काठीने
रस्त्यावर चोपले.
व्हिडिओ व्हायरल
२० सेकंदाच्या व्हिडिओमध्ये खासदाराच्या बहिणीला सासरे दांडक्याने
मारताना आणि त्याच वेळी मोबाईलवर रेकॉर्डिंग करतानाही दिसतात. तर दीर तिला केस ओढत
खेचताना आढळतो.
पीडितेची तक्रार
रिनाने पोलिसांकडे दिलेल्या तक्रारीत, तिच्यावर
जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला आणि वारंवार धमक्या दिल्याचं नमूद केलं आहे.
पोलिस कारवाई
फर्रुखाबाद पोलिसांनी आरोपी सासरे व दोन्ही दीरांविरुद्ध गुन्हा
नोंदवला असून चौकशी सुरू आहे.