सोलापुरात धक्कादायक घटना – धावत्या एसटीला आग

सोलापूर, दि. २९ एप्रिल २०२५ – सोलापुरातील बोरामणी गावाजवळ एक एसटी बस भीषण आगीत जळून खाक झाली. ही बस उमरगाच्या दिशेने निघाली होती. मात्र, प्रवासादरम्यान अचानक बसने पेट घेतला. या घटनेमुळे काही काळ परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं. सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही. चालकाच्या सतर्कतेमुळे सर्व प्रवाशांना वेळीच बसमधून बाहेर काढण्यात आलं. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल तातडीने घटनास्थळी दाखल झालं, मात्र आग इतकी भीषण होती की काही क्षणात संपूर्ण बस जळून खाक झाली.