हंपी येथे परदेशी महिला आणि होमस्टे ऑपरेटरवर बलात्कार; ओडिशातील पर्यटकाचा मृत्यू

बंगळूर : कर्नाटकातील प्रसिद्ध हंपी पर्यटनस्थळी परदेशी महिला आणि एका स्थानिक होमस्टे ऑपरेटरवर सामूहिक बलात्कार, तर एका पर्यटकाच्या हत्येची धक्कादायक घटना समोर आली आहे.

कसा घडला हा भयंकर प्रकार?

गुरुवारी रात्री ११:०० ते ११:३० दरम्यान सानापूर तलावाजवळ ही घटना घडली.
तीन हल्लेखोर मोटारसायकलवर आले आणि पर्यटकांकडे पेट्रोल पंपाबद्दल विचारपूस केली.
पेट्रोल नसल्याचे समजल्यानंतर त्यांनी पैसे मागण्यास सुरुवात केली आणि नकार मिळाल्यानंतर मारहाण केली. त्यांनी तीन पुरुष पर्यटकांना जबरदस्तीने कालव्यात ढकलले.
त्यानंतर दोन हल्लेखोरांनी २७ वर्षीय इस्रायली महिला आणि २९ वर्षीय होमस्टे ऑपरेटरवर बलात्कार केला. ओडिशा पर्यटकाचा मृत्यू, अन्य दोघे गंभीर जखमी कालव्यात फेकलेल्या ओडिशा येथील एका पर्यटकाचा मृतदेह शनिवारी आढळून आला. अमेरिकन पर्यटक आणि महाराष्ट्रातील पर्यटक गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

पोलिसांचा तपास आणि पुढील कारवाई

पोलिसांनी तातडीने विशेष तपास पथक नेमले असून, श्वान पथक आणि अग्निशमन विभागाच्या मदतीने आरोपींचा शोध सुरू आहे.
एफआयआर नोंदवण्यात आला असून गंगावती ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कन्नड आणि तेलुगू भाषा बोलणाऱ्या आरोपींची ओळख पटवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. हंपीसारख्या पर्यटनस्थळी झालेल्या या घटनेमुळे सुरक्षा व्यवस्थेबाबत मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.