बार्शी तालुक्यातील धक्कादायक घटना सासुरे येथे गोळीबारात पैठणच्या युवकाचा मृत्यू !

वैराग, दि. ९ बार्शी तालुक्यातील सासुरे येथे एका युवकाचा
गोळीबारात जागीच मृत्यू झाला असल्याची घटना मंगळवारी सकाळी उघडकीस आली आहे. हा खून आहे की आत्महत्या ? याबाबतचा तपास वैराग पोलीस
यंत्रणा करीत आहे. यातील मयत युवकाचे नाव
गोविंद जगन्नाथ बर्गे ( ३८ ) असे असून पैठण ( ता. गेवराई ) येथील रहिवासी असल्याची
प्राथमिक माहिती मिळाली आहे. गोळीबाराची
धक्कादायक घटना घडल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे. तर घटनास्थळी बार्शीचे पोलिस
उपविभागीय अधिकारी अशोक सायकर यांच्यासह वैराग पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक
कुंदन गावडे यांची टीम दाखल झाली आहे.
पत्रकार - आण्णासाहेब कुरुलकर
मो. ९४२१०३०५३२