सोरेगाव येथील ब्रिजधाम आश्रमात शिवसंध्या भरतनाट्यम नृत्याविष्कार

सोलापूर : विना नृत्यकला अकॅडमी सोलापूर तसेच नृत्यदर्पण डान्स अकॅडमी पंढरपूर यांच्या संयुक्त विद्यमाने सोरेगाव येथील ब्रिजधाम आश्रमात "शिवसंध्या भरतनाट्यम नृत्याविष्कार" हा भव्य सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात नटराज मूर्तीच्या पूजनाने झाली. त्यानंतर नृत्य विशारद रामेश्वरी जांभळे यांनी कीर्तन सादर केले. कुमारी प्रेरणा परदेशीने ‘चंद्र चुडे शिव’ ही भक्तिरचना सादर करून वातावरण भक्तिमय केले, तर कुमारी संजनी सुलगुंडले हिने ‘कर्पूर गौरम करूणावतारम’ या नृत्यकृतीने उपस्थितांची मने जिंकली.
नृत्याचा विविधांगांनी साज
या कार्यक्रमात विविध नृत्य
प्रकारांचे दर्शन घडविण्यात आले.
🔸 भरतनाट्यमसह लावणी, रासलीला,
रामलीला, घुमर, दांडिया
आणि भांगडा अशा विविध नृत्यप्रकारांचे सादरीकरण करण्यात आले.
🔸 देशभरातील पारंपरिक नृत्यशैलींमध्ये भारताचे
सांस्कृतिक वैभव प्रतिबिंबित होते.
🔸 चित्रपटसृष्टीतही भरतनाट्यमला महत्त्वाचे
स्थान असून ही कला ध्यान व कौशल्य प्रदान करते.
विद्यार्थिनींचा मंत्रमुग्ध करणारा नृत्याविष्कार कार्यक्रमात नृत्यालयाच्या २० विद्यार्थिनींनी सहभाग घेतला आणि आपल्या नृत्याविष्काराने प्रेक्षकांना मोहून टाकले. सांस्कृतिक कार्यक्रमाच्या माध्यमातून नृत्यकलेचे सौंदर्य आणि तांत्रिकता सादर करण्याचा प्रयत्न यशस्वी ठरला. या कार्यक्रमाबाबत नृत्यप्रेमींनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कविता रसाळकर यांनी केले.