शिवरायांनी संपूर्ण देशाला स्वराज्याचा मंत्र दिला : गृहमंत्री अमित शाह

मुंबई: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह
यांनी रायगडावर आयोजित छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुण्यतिथी सोहळ्यात बोलताना
सांगितले की, देशातील गुलामीची मानसिकता छत्रपती
शिवाजी महाराजांनी मोडीत काढली. त्यांनी स्वराज्याचं स्वप्न पूर्ण केलं आणि
संपूर्ण देशाला स्वराज्याचा मंत्र दिला. अमित शाह यांनी पुढे सांगितले की, छत्रपती
शिवाजी महाराजांच्या विचारांना महाराष्ट्रापुरते मर्यादित न ठेवता, त्यांना
संपूर्ण जगभर पोहचवण्याचे कार्य पुढे सुरू करायला हवे. येत्या काळात त्यांचे विचार
आणखी प्रगल्भ होऊ शकतात, असं त्यांनी आवाहन केलं. याच
कार्यक्रमानंतर शिवसेना नेते संजय राऊत यांनी महायुतीवर टीका केली. राऊत म्हणाले
की, "छत्रपती
शिवाजी महाराज हे युगपुरूष आहेत. त्यांची आत्मा महाराष्ट्राच्या कणाकणात आहे. लोक
महाराष्ट्राला तोडण्याचा प्रयत्न करत आहेत." त्यांनी
महायुतीवर आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली. राऊत
यांनी फडणवीसांना आव्हान दिलं की, "जर मुख्यमंत्री गेल्या अनेक
महिन्यांपासून नाशिक आणि रायगड यांना पालकमंत्री देऊ शकत नाहीत, तर राज्य
कसं चालवणार?" संजय राऊत यांनी केंद्रीय
गृहमंत्री अमित शाह यांच्या दौऱ्यावरही टीका केली. "अमित शाह गृहमंत्री आहेत, त्यांच्या
कडे लष्कराचं हेलिकॉप्टर आहे, ते प्रतापगडावर पंढीतले पंडित
नेहरूंप्रमाणे मोटारीने जात नाहीत," असं राऊत म्हणाले. ते पुढे म्हणाले
की, शिंदे आणि
शेलार यांच्या पक्षाचे नेते अमित शहा आहेत, त्यांनीच या पक्षाला जन्म दिला
आहे.