शिवा संघटनेचा बुधवारी बसवकल्याण येथे वर्धापन दिन सोहळा

सोलापूर : शिवा अखिल भारतीय वीरशैव युवक संघटनेच्या वतीने बुधवार दि. 28 जानेवारी 2025 रोजी 108 फूट उंच महात्मा बसवेश्वर पुतळा, बसवकल्याण येथे दुपारी 12.30 वाजता 29 वा वर्धापन दिन सोहळा आयोजित करण्यात आला आहे, अशी माहिती पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष अरविंद पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिवा संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रा. मनोहर धोंडे हे राहणार आहेत. कर्नाटकचे वनमंत्री ईश्वर खंड्रे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात येणार आहे. यावेळी स्वागताध्यक्ष आ. शरणू सलगर (बसवकल्याण) आदींसह मान्यवरांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. यावेळी धर्मगुरूंना निमंत्रित करण्यात आले आहे. या मेळाव्यास सोलापूर जिल्ह्यातून सुमारे एक हजार कार्यकर्ते जाणार आहेत, असे अरविंद पाटील यांनी सांगितले. या पत्रकार परिषदेत महांतेश्वर पाटील, ओमप्रकाश बाबळे, महेश ईचगे, सुरेश तोरनगी, परमेश्वर माळगे , रामचंद्र माळी, शिवानंद  येरटे आदी उपस्थित होते.