शिवसेना ठाकरे गटाकडून एसटी तिकीट दरवाढी विरोधात निदर्शने
.jpeg)
सोलापूर : सोलापूर एस.टी. बसस्थानकात आज शिवसेना ठाकरे गटाकडून
एसटी तिकीट दरवाढी विरोधात निदर्शने करण्यात आली. यावेळी अर्धातास बस रोखून
धरण्यात आली. एसटीचे तिकीट दर नुकतेच 15 टक्क्यांनी वाढविण्यात आले आहेत. यामुळे
सर्वसामान्यांचा प्रवास महागला आहे. या निषेधार्थ ठाकरे गट आक्रमक दिसला. एसटीचे
वाढवलेले तिकीट दर कमी करावे या मागणीसाठी निदर्शने करण्यात आली. बससमोर
जिल्हाप्रमुख अजय दासरी, गणेश वानकर याचप्रमाणे पदाधिकारी प्रताप
चव्हाण, महेश धाराशिवकर यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी आणि
कार्यकर्ते सहभागी झाले होते.