शिवप्रताप दिन उत्साहात साजरा

सोलापूर, दि. १०-

येथील शिवसेवक प्रतिष्ठान हिंदुस्थान संस्थेच्यावतीने शिवप्रताप दिन उत्साहात साजरा करण्यात आला. शिवस्मारक सभागृहात आयोजित या कार्यक्रमाप्रसंगी प्रारंभी छत्रपती शिवरायांना मानवंदना देण्यात आली. स्वराज्य व धर्माच्या आड येऊन हिंदूंच्या मंदिरांची तोडफोड करत, रयतेवर अन्याय करणारा यवन विजापूरहून स्वराज्यावर आक्रमण करण्यासाठी निघाला. पंढरपूर, तुळजापूर येथे देवस्थानाची तोडफोड करून तो वाई प्रांतात धडकला. छत्रपती शिवरायांनी प्रताप पायथ्याला या यवन संपविले. स्वराज्य गडाच्या राक्षसास रक्षणाचा विजयोत्सव म्हणून शिवप्रताप दिन मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. शिवरायांनी अफजल खानवर मिळविलेला विजय म्हणजे शिवप्रताप दिन. तसेच शिवरायांच्या संयमाने अफजल खानाच्या असंयमावर विजय म्हणजे शिवप्रताप दिन होय, असे

येथील शिवसेवक प्रतिष्ठान हिंदुस्थान संस्थेच्यावतीने शिवप्रताप दिन उत्साहात साजरा करण्यात आला.

शिवस्मारक सभागृहात आयोजित या कार्यक्रमाप्रसंगी प्रारंभी छत्रपती शिवरायांना मानवंदना देण्यात आली. स्वराज्य व धर्माच्या आड येऊन हिंदूंच्या मंदिरांची तोडफोड करत, रयतेवर अन्याय करणारा यवन विजापूरहून स्वराज्यावर आक्रमण करण्यासाठी

निघाला. पंढरपूर, तुळजापूर येथे देवस्थानाची तोडफोड करून तो वाई प्रांतात धडकला. छत्रपती शिवरायांनी प्रताप पायथ्याला या यवन संपविले. स्वराज्य गडाच्या राक्षसास रक्षणाचा विजयोत्सव म्हणून शिवप्रताप दिन मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. शिवरायांनी अफजल खानवर मिळविलेला विजय म्हणजे शिवप्रताप दिन. तसेच शिवरायांच्या संयमाने अफजल खानाच्या असंयमावर विजय म्हणजे शिवप्रताप दिन होय, असे

संस्थेचे संस्थापक मारुती सुरवसे यांनी सांगितले.

शिवरायांच्या पराक्रमापासून प्रेरणा घेऊन देव, देश, धर्म व शिवकार्यापासून युवकांनी समाजकार्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी स्वप्निल सावळगी, समर्थ हंचाटे, इरण्णा मठपती, कार्तिक संगमनूर, संदीप निराळे, विठ्ठल जमादार आदी उपस्थित होते.