श्री शिवाजी महाराज सोसायटीच्या अध्यक्षपदी शंकर कणसे, उपाध्यक्षपदी संजय जंबुरे

विजयपूर - जिल्ह्यातील प्रतिष्ठित श्री शिवाजी महाराज को.ऑप. क्रेडिट सोसायटीच्या अध्यक्ष व उपाध्यक्षपदासाठी झालेल्या निवडणुकीत अध्यक्षपदी शंकर कणसे तर उपाध्यक्षपदी संजय जंबुरे यांची बिनविरोध निवड झाल्याचे निवडणूक अधिकारी महेश हिटनळ्ळी यांनी जाहीर केले.

 सोसायटीच्या सभागृह झालेल्या या निवडणुक प्रक्रियेत निवडणूक अधिकारी महेश हिटनळ्ळी यांना मुख्य व्यवस्थापक संजय जाधव, सह व्यवस्थापक अंबादास चव्हाण यांनी सहकार्य केले. नूतन संचालक मंडळाचे सदस्य डॉ सदाशिव पवार, बाबूराव तरसे, श्रीमती सरोजिनी निक्कम, अंबुताई जाधव, रवि मदभावी, भरत देवकुळे, रामचंद्र चव्हाण, पांडुरंग रोहिते प्रविण बोडके यांना निवड झाल्याबद्दल प्रमाण पत्र देण्यात आले. नूतन अध्यक्ष शंकर कणसे उपाध्यक्ष संजय जंबुरे व  संचालक मंडळाच्या सर्व सदस्यांचा सत्कार सोसायटीचे कर्मचारी वर्ग यांच्यावतीने करण्यात आला.