सोलापूरमध्ये एम्स रुग्णालय उभारा

नवी दिल्ली, दि. १२- सोलापूरमध्ये अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थान (एम्स) उभारण्यात यावे, या मागणीचे पत्र खासदार प्रणिती शिंदे यांनी केंद्रीय आरोग्यमंत्री जगत प्रकाश नड्डा यांना लिहिले आहे.

नड्डा यांना लिहिलेल्या पत्रात प्रणिती शिंदे म्हणाल्या की, सोलापूरची भौगोलिक स्थिती आणि लोकसंख्या पाहता सोलापूर जिल्ह्यासह आजूबाजूच्या जिल्ह्यातील नागरिकांना उत्तम आरोग्य सुविधा मिळणे गरजेचे आहे. यासाठी सोलापूरमध्ये एम्ससारख्या अद्ययावत रुग्णालयाची आवश्यकता आहे. सोलापूर शैक्षणिक, औद्योगिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या एक महत्त्वाचा जिल्हा मानला जातो. सोलापूर शहरात लोकसंख्येचीघनता अधिक आहे. शिवाय ग्रामीण भागात आरोग्याच्या सोयी सुविधा उपलब्ध होत नाहीत. त्यामुळे विविध आजारांवर उपचार करण्यासाठी नागरिकांना शहरात धाव घ्यावी लागते. या पार्श्वभूमीवर सोलापूरमध्ये एम्सची स्थापना होणे एक गरजेची बाब असून त्याचा लाखो रुग्णांना फायदा होणार असल्याचे शिंदे यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे.आरोग्य सेवांच्या उभारणीसाठी एम्ससारख्याअत्याधुनिक रुग्णालयाची आवश्यकता असल्यामुळे शिंदे यांनी संसदेतही सोलापूरसाठी ही मागणी उपस्थित केली. सोलापूरच्या आरोग्य व्यवस्थेची सुधारणा आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने उच्च दर्जाचे उपचार उपलब्ध होण्यासाठी हे पाऊल महत्त्वाचे ठरणार आहे. तसेच महाराष्ट्र सरकार सोलापूरम ध्ये एम्स उभे राहण्यासाठी मदत करण्यास तयार आहे. त्यामुळे सोलापूर हे एम्स प्रकल्पासाठी योग्य ठिकाण ठरेल, असेही शिंदे