अंकोली परिसरातील चार युवकांची महसूल मंत्रालय सहाय्यक पदी निवड

कोली, दि.१२(दशरथ रणदिवे):-महाराष्ट्र
लोकसेवा आयोगाच्या वतीने घेण्यात आलेल्या परीक्षेतून महसूल मंत्रालय सहाय्यक या
पदावर अंकोली परिसरातील चार युवकांची
नुकतीच निवड झाली आहे.*. यामध्ये
मोहोळ तालुक्यातील स्नेहल
सज्जन घाडगे (अंकोली), अक्षय
सुखदेव सुरवसे(सौंदणे), दिपक
नागनाथ माळी (शेज बाभूळगाव) आणि राजदिप बबन पवार (कोथाळे) यांचा समावेश आहे.यामधील
अंकोली येथील स्नेहल घाडगे ही जि.प.शाळा रणदिवेवस्ती शाळेचे मुख्याध्यापक सज्जन
शंकर घाडगे यांची मुलगी आहे.तिचे प्राथमिक शिक्षण येथील
जिल्हा परिषद शाळेत,माध्यमिक
शिक्षण भैरवनाथ विद्यालयात तर महाविद्यालयीन शिक्षण मोहोळ येथे देशभक्त संभाजीराव
गरड महाविद्यालयात झाले.सौंदणे येथील अक्षय सुरवसे हा जि.प.शाळा वरकुटे शाळेचे
मुख्याध्यापक सुखदेव तुकाराम सुरवसे यांचा मुलगा आहे.त्याचे प्राथमिक शिक्षण
वरकुटेवस्ती येथील जिल्हा परिषद शाळेत तर माध्यमिक शिक्षण सुयश विद्यालय,सोलापूर येथे झाले. जेएसपीएम,पुणे येथून संगणक अभियांत्रिकी
मधून त्याने पदवी घेतली. तर शेजबाभूळगाव
येथील दिपक नागनाथ माळी याचे प्राथमिक शिक्षण जि.प.शाळा शेजबाभूळगाव येथे आणि
माध्यमिक शिक्षण अंकोली येथील भैरवनाथ विद्यालयात झाले.पंढरपूर येथील कर्मवीर
भाऊराव पाटील महाविद्यालयातून त्याने बीएस्सी पूर्ण केल्यानंतर महाराष्ट्र
शासनाच्या पाटबंधारे विभागात कालवा निरीक्षक म्हणून निवड झाली.सध्या तो या पदावर
कार्यरत आहे. महसूल सहाय्यक यासह कर सहाय्यक या पदावरही त्याची निवड झाली
आहे.अत्यंत गरीब परिस्थिती असूनही अभ्यास आणि कष्टाच्या जोरावर माळी याने स्पर्धा
परीक्षेत यश मिळविले.कोथाळे येथील राजदिप बबन पवार याचे प्राथमिक शिक्षण जि.प.शाळा
कोथाळे येथे तर माध्यमिक शिक्षण इंचगाव येथील संभाजीराव शिंदे प्रशालेत झाले.
गोपाळपूर येथील स्वेरीमध्ये अभियांत्रिकीचे शिक्षण घेतल्यानंतर खाजगी कंपनीत नोकरी
केली.ही नोकरी सोडून स्पर्धा परीक्षेची तयारी केली. अंकोली पंचक्रोशीतील या तरुण
युवकांनी मिळविलेल्या यशाचे परिसरातून
मोठे कौतुक होत आहे.
*फोटोतील
नावे अनुक्रमे-
1) स्नेहल
घाडगे
2) दीपक माळी
3) अक्षय
सुरवसे
4) राजदीप
पवार