राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांची गुप्त बैठक?

मुंबई – मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
यांची मुंबईतील एका नामांकित हॉटेलमध्ये बैठक झाल्याची माहिती समोर आली आहे. ही
बैठक अत्यंत गुप्त ठेवण्यात आली होती, आणि दोन्ही नेत्यांनी यावर
कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही. या भेटीमागचे नेमके कारण अजून स्पष्ट
झाले नसले तरी आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय चर्चांना जोर मिळाला आहे.
भाजप आणि मनसे यांच्यात युती होण्याच्या शक्यतेकडे राजकीय विश्लेषक लक्ष देत आहेत.
ही बैठक एक साधा सौजन्यभेट होती की राजकारणातील नवे समीकरण, हे
लवकरच स्पष्ट होईल.