काश्मीरमध्ये सर्च ऑपरेशन
.jpeg)
नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरमधील कठुआमध्ये दहशतवाद्यांचा शोध सुरू आहे. सुरक्षा दलांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी रात्री उशिरा कठुआच्या भातोडी भागात संशयास्पद हालचाली दिसल्या. यानंतर गोळीबार झाला. दहशतवाद्यांच्या शोधात सर्च ऑपरेशन सुरू आहे. पंजाबमधील अमृतसर येथे आंतरराष्ट्रीय सीमेवर बीएसएफने ड्रोन आणि ड्रग्स जप्त केले. पंजाबमधील अमृतसर येथील आंतरराष्ट्रीय सीमेवर तैनात सीमा सुरक्षा दलाने (बीएसएफ) शुक्रवारी आणखी 559 ग्रॅम हेरॉईन (ड्रग्ज) जप्त केले. बीएसएफने सांगितले की, दुपारी 1.40 च्या सुमारास 01 डीजेआय एअर 3एस ड्रोन आणि हेरॉइन कक्कर गावाला लागून असलेल्या शेतातून जप्त करण्यात आले. यापूर्वी फाजिल्का जिल्ह्यातील सीमावर्ती भागातून दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोन ड्रोन जप्त करण्यात आले होते.