एससीओ समिट 2025 : राजनाथ सिंह चीनमध्ये; कैलास मानसरोवर यात्रा पुन्हा सुरू होणार

किंगदाओ (चीन) : केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह हे SCO सदस्य देशांच्या संरक्षण मंत्र्यांच्या बैठकीसाठी किंगदाओ येथे दाखल झाले. या दरम्यान त्यांनी चीनचे संरक्षण मंत्री अॅडमिरल डॉन जून यांची भेट घेतली. चर्चेनंतर सुमारे सहा वर्षांनी कैलास मानसरोवर यात्रा पुन्हा सुरू करण्यावर
सकारात्मक चर्चा झाल्याची माहिती राजनाथ सिंह यांनी
दिली. राजनाथ सिंह यांनी सोशल मीडियावर
पोस्ट करत, “द्विपक्षीय संबंधांवरील मुद्द्यांवर
रचनात्मक आणि दूरदर्शी विचारांची देवाणघेवाण झाली. कैलास मानसरोवर यात्रा पुन्हा
सुरू झाल्याचा आनंद आहे,” असे म्हटले. या समिटमध्ये त्यांनी रशियाचे संरक्षण मंत्री आंद्रेई बेलोसोव्ह आणि बेलारूसचे संरक्षण मंत्री लेफ्टनंट
जनरल व्हिक्टर ख्रेनिन यांच्याशीही स्वतंत्र चर्चा केली.
या बैठकीत सुरक्षा आव्हाने, संरक्षण सहकार्य आणि भागीदारीला
बळकटी देण्यावर चर्चा झाली.
सीमा तणाव कमी करण्यासाठी भारताची
मांडणी:
- सीमा
विच्छेदन प्रक्रिया पूर्णपणे पाळली जावी.
- तणाव
कमी करण्यासाठी प्रयत्न व्हावेत.
- सीमा
वाद सोडवण्याची प्रक्रिया गतीमान व्हावी.
- विद्यमान
यंत्रणांचा वापर करून मतभेद मिटवावेत.