"लाडकी बहीण योजनेत ४,८०० कोटींचा घोटाळा? सुप्रिया सुळे यांचा महायुती सरकारवर हल्लाबोल"

मुंबई (२९ जुलै २०२५) — 'लाडकी बहीण'
योजनेमध्ये 4,800कोटी रुपयांचा घोटाळा
झाल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) नेत्या आणि खासदार सुप्रिया
सुळे यांनी केला आहे. पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी महायुती सरकारवर जोरदार
हल्लाबोल केला आणि या प्रकरणाची चौकशी CBI, ED आणि SIT
मार्फत करण्याची मागणी केली. सुळे म्हणाल्या, “महाराष्ट्र सरकारच्या आकडेवारीनुसार, योजनेत १४,298 पुरुष लाभार्थी असल्याचे आढळून आले असून त्यामुळे २१.४४ कोटींचे नुकसान झाले
आहे. याशिवाय अपात्र महिलांना लाभ देणे, एकाच कुटुंबातील
अनेक अर्ज मंजूर होणे यामुळे सुमारे १,६४० कोटींचे नुकसान झाले
आहे. एकूण घोटाळ्याचा आकडा ₹४,8००
कोटींवर गेला आहे.”
त्या पुढे म्हणाल्या, “या योजनेसाठी एका खासगी सॉफ्टवेअर कंपनीला
जबाबदारी देण्यात आली होती. मग त्यांनी पुरुषांचे अर्ज पात्र ठरवले कसे? आणि त्यामागची जवाबदारी कोणाची? याची सखोल चौकशी
व्हायला हवी. योजनेंतर्गत झालेली सर्व आर्थिक व्यवहारांची ऑडिट झाली पाहिजे.” “ही रक्कम 'राऊंड ट्रिपिंग' झाली
आहे का? कष्टकरी महिलांच्या नावाखाली हे पैसे कोणाच्या खिशात
गेले? अंतिम सही कोणी केली? या
प्रत्येक प्रश्नाचं उत्तर सरकारने द्यावं,” असेही सुळे यांनी
ठामपणे म्हटले.