काँग्रेसच्या विधान परिषदेतील गटनेतेपदी सतेज पाटील:अमित देशमुख बनले मुख्य प्रतोद

नविदिल्ली : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अध्यक्षपदी हर्षवर्धन सपकाळ
यांची अनपेक्षितपणे निवड झाल्यानंतर अध्यक्षपदाच्या शर्यतीत असलेल्या नेत्यांची
विविध पदावर नियुक्ती करून हाय कमांडने काँग्रेसला सक्रिय करण्याचा प्रयत्न केला
आहे. काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन
खरगे यांनी शनिवारी महाराष्ट्रातील काँग्रेस विधिमंडळ पक्ष पदाधिकाऱ्यांच्या
नियुक्त्या केल्या. त्यात काँग्रेस नेते सतेज उर्फ बंटी पाटील यांची विधान
परिषदेतील गटनेतेपदी निवड करण्यात आली आहे. तर दिवंगत माजी मुख्यमंत्री विलासराव
देशमुख यांचे सुपुत्र तथा माजी मंत्री अमित देशमुख यांची मुख्य प्रतोदपदी नियुक्ती
करण्यात आली आहे. दुसरीकडे विधानसभेतील उपनेतेपदी अमीन पटेल यांची नियुक्ती
करण्यात आली आहे.
हर्षवर्धन सपकाळ यांनी ट्विटर -क्स वरून हि यादी जाहीर
केली आहे.
अमीन पटेल - विधानसभा उपनेते @mlaAminPatel
अमित देशमुख - मुख्य प्रतोद विधानसभा @AmitV_Deshmukh
विश्वजीत कदम - सचिव विधानसभा @vishwajeetkadam
शिरीषकुमार नाईक - प्रतोद - विधानसभा @AshwinVasa78648
संजय मेश्राम - प्रतोद - विधानसभा @sanjaym_inc
सतेज ऊर्फ बंटी पाटील - गटनेता - विधानपरिषद @satejp
अभिजीत वंजारी - मुख्य प्रतोद - विधानपरिषद @abhijitwanjari4
राजेश राठोड - प्रतोद - विधानपरिषद @RajeshRathodINC