संतोष देशमुखच्या मुलीला बारावीत पडले 85% ‘वडील असते तर…’ – वैभवी देशमुख आंसूंचा क्षण

महाराष्ट्रात आज बारावीचा निकाल जाहीर झाला आणि या निकालात एक प्रेरणादायी गोष्ट समोर आली आहे. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची मुलगी वैभवी देशमुख हिने ५% गुण मिळवून यश संपादन केलं, तेही वडिलांच्या निर्घृण हत्येनंतर केवळ काही महिन्यांतनिकालाआधी वैभवी भावुक झाली होती. "माझ्या पाठीवर कौतुकाची थाप मारायला आज माझे वडील नाहीत. पण त्यांच्या आशीर्वादाने माझा निकाल चांगला लागेल," असं ती म्हणाली. वैभवीने निकाल पाहण्याआधी वडिलांच्या छायाचित्राचं दर्शन घेतलं, आणि मग निकाल पाहून डोळे पाणावले. "न्याय मिळावा, आणि लवकर मिळावा" – वैभवी देशमुख निकालानंतर वैभवीने भावना व्यक्त करताना सांगितलं, “आता पाच महिने झाले तरी आम्ही न्यायाच्या प्रतीक्षेत आहोत. गुन्हेगारांना कठोर शिक्षा मिळाली पाहिजे. गुन्हे वाढत राहिले, तर देश मागेच जाईल, असं तिनं ठामपणे नमूद केलं. संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर राज्यात प्रचंड खळबळ उडाली होती. त्यांचा परिवार अजूनही मानसिक आणि कायदेशीर संघर्षातून जात आहे. अशा परिस्थितीत वैभवीने मिळवलेले हे यश अनेक विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.