वक्फ सुधारणा विधेयकावर संजय राऊत यांचा हल्लाबोल; "फडणवीसांना मिशा फुटल्या नव्हत्या, तेव्हा आम्ही हिंदुत्वाच्या मिशांना पीळ देत होतो!"

🔹 वक्फ विधेयकावरून संजय राऊतांचा आक्रमक पवित्रा
संसदेत वक्फ सुधारणा विधेयकावर गदारोळ सुरू असताना, ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर जोरदार टीका केली आहे. फडणवीस हिंदुत्व शिकवण्याच्या योग्यतेत नाहीत असा आरोप करत, "फडणवीसांना मिशा फुटल्या नव्हत्या, तेव्हा आम्ही हिंदुत्वाच्या मिशांना पीळ देत होतो" असे ते म्हणाले.

🔹 विधेयकाचा उद्देश आणि आरोप
संजय राऊत म्हणाले, "वक्फ विधेयकाचा हिंदुत्वाशी काहीही संबंध नाही. हे विधेयक काही लाडक्या उद्योगपतींना जमिनी देण्यासाठी आणले जात आहे." त्यांनी आरोप केला की आरएसएसलाही या विधेयकाला पूर्णपणे पाठिंबा नाही.

🔹 हिंदूंना जागा नाकारण्यावर सवाल
संजय राऊत यांनी मुंबईत जैन समुदायाला जागा नाकारल्या जाण्याचा मुद्दा उपस्थित करत भाजपवर हल्ला चढवला. ते म्हणाले, "मांसाहारी आहेत म्हणून मुंबई, ठाणे आणि मीरा-भाईंदर येथे हिंदूंना जागा नाकारल्या जातात. भाजप सरकार यावर कारवाई करणार का?"