संगमेश्वर कॉलेजला महाराष्ट्र शासनाच्या 'करिअर कट्टा' चे जिल्हास्तरीय प्रथम पारितोषिक

सोलापूर : संगमेश्वर कॉलेज (स्वायत्त), सोलापूर यांनी आपल्या उज्वल कामगिरीचा ठसा उमटवत महाराष्ट्र शासनाच्या 'करिअर कट्टा' उपक्रमात जिल्हास्तरीय उत्कृष्ट महाविद्यालयाचा प्रथम क्रमांक पटकावला आहे. महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण विभाग, महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्र आणि द. भै. फ. दयानंद कला व शास्त्र महाविद्यालय, सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने विभागीय पुरस्कार वितरण सोहळा आणि कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. या सोहळ्याचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. बी.एच. दामजी आणि महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्राचे अध्यक्ष मा. श्री. यशवंत शितोळे यांच्या प्रमुख उपस्थितीत संगमेश्वर कॉलेजला हा सन्मान प्रदान करण्यात आला. विशेष म्हणजे, प्रभारी प्राचार्य डॉ. ऋतुराज पुरुषोत्तम बुवा यांना ‘जिल्हास्तरीय उत्कृष्ट प्राचार्य’ हा बहुमान मिळाला आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली करिअर कट्टा समन्वयक डॉ. शिवाजी मस्के आणि प्रा. युवराज सोलापूरे यांनी वर्षभर विविध करिअर मार्गदर्शन उपक्रम प्रभावीपणे राबवले. या उल्लेखनीय यशामुळे महाविद्यालयाच्या शैक्षणिक गुणवत्ता आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी केलेल्या प्रयत्नांना मोठी दाद मिळत आहे. श्री संगमेश्वर एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष मा. व. धनंजय माने, चेअरमन श्री. धर्मराज काडादी, सचिव प्रा. ज्योती काडादी आणि शैक्षणिक सल्लागार डॉ. प्रमोद दर्गोपाटील यांनी महाविद्यालयाच्या या यशाबद्दल अभिनंदन केले. तसेच शिक्षकवृंद, विद्यार्थी आणि शिक्षण क्षेत्रातील विविध मान्यवरांनी आनंद व्यक्त केला असून, प्राचार्य डॉ. बुवा आणि त्यांच्या संपूर्ण टीमचे सर्व स्तरातून अभिनंदन केले जात आहे.