संभाजी ब्रिगेड महिला आघाडीचा पत्ते खेळून कृषी मंत्र्याचा निषेध....

राज्याच्या अधिवेशनादरम्यान कृषिमंत्री माणिकराव कोकाटे विधानसभेत ऑनलाईन रमी खेळताना आढळले. या प्रकरणावर प्रश्न विचारण्यासाठी गेलेल्या छावा संघटनेचे अध्यक्ष विलास घाडगे पाटील यांना राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) युवक प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण यांनी मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. याच्या निषेधार्थ संभाजी ब्रिगेड महिला आघाडी, सोलापूर यांच्यावतीने प्रतिकात्मकरित्या पत्ते खेळत अजित पवार, माणिकराव कोकाटे, खासदार सुनील तटकरे आणि सुरज चव्हाण यांचा जाहीर निषेध करण्यात आला. महिलांचा संतप्त रोष महिला कार्यकर्त्यांनी म्हटलं की, "राज्याच्या कृषी खात्याचा 9710 कोटींचा बजेट असून, त्याचे मंत्री स्वतः रमी खेळतात. रोज सरासरी 8 शेतकरी आत्महत्या करतात, आणि सरकार मात्र बघ्याची भूमिका घेत आहे." या आंदोलनादरम्यान महिलांनी अजित पवारांवर गावगुंडांना पाठीशी घालण्याचा आरोप केला. तसेच तटकरे बघ्याची भूमिका घेत असल्याचं सांगितलं. कायदेशीर कारवाईची मागणी गुंडगिरी करणाऱ्या सुरज चव्हाण यांच्यावर तात्काळ कायदेशीर कारवाई करावी व त्याला अटक करावी, अशी मागणी करण्यात आली.
उपस्थित महिला पदाधिकारी:
- मिनल
ताई दास
– जिल्हाध्यक्ष
- सुनीता
घंटे
– दक्षिण सोलापूर तालुका अध्यक्ष
- जयश्री
जाधव
– शहर कार्याध्यक्ष
- मनिषा
कोळी
– शहर उपाध्यक्ष
- संजीवनी
सलबत्ते
– उत्तर तालुका अध्यक्ष
- मैना
साळुंखे
– प्रमुख कार्यकर्त्या
संभाजी ब्रिगेडने स्पष्टपणे
सांगितले की, “ही सत्तेची
दादागिरी असून आम्ही महिला म्हणून हे सहन करणार नाही.”