"सलमान खानला पुन्हा जीवे मारण्याची धमकी"

बॉलिवूड अभिनेता सलमान खानबाबत मोठी बातमी समोर आली आहे. अभिनेत्याला त्याच्या घरात घुसून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. एवढेच नाही तर त्याची गाडी बॉम्बने उडवून देण्याची धमकी देण्यात आली आहे. वरळी पोलीस ठाण्यात फोन करणाऱ्या अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याआधीही सलमानला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. याआधीही सलमानला अनेक वेळा धमक्या मिळाल्या आहेत. अभिनेत्याला गुंड लॉरेन्स बिश्नोई आणि गोल्डी ब्रार यांनी अनेक वेळा धमक्या दिल्या आहेत. या सततच्या धमक्या असूनही, सलमान खान त्याच्या कामाबद्दल सक्रिय आहे. त्याने त्याच्या कामाशी कधीही तडजोड केलेली नाही. सलमान खान गेल्या कित्येक वर्षांपासून बिष्णोई गँगच्या टार्गेटवर आहे. काही महिन्यांपूर्वी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे माजी आमदार बाबा सिद्दीकी यांची भर रस्त्यात गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. बाबा सिद्दीकी आणि सलमान खान तसेच बॉलीवूड यांचे घनिष्ठ संबंध होते. सिद्दीकींच्या हत्येची जबाबदारी विष्णोई गैंगनं स्विकारली. पुढे काही दिवसांतच सलमान खान, शाहरुख खान यांनाही धमक्या देण्यात आल्या होत्या. आता पुन्हा सलमानला अज्ञात व्यक्तीने धमकी दिली आहे. सलमानचा सिकंदर' हा चित्रपट नुकताच ईदच्या मुहूर्तावर प्रदर्शित झाला. ते ए.आर. मुर्गाडोस यांनी बनवले होते. या चित्रपटात सलमानच्या सोबत रश्मिका मंदान्ना होती. चित्रपटाचे खूप प्रमोशन झाले, परंतु कमकुवत कथनाकामुळे हा चित्रपट चाहत्यांना प्रभावित करू शकला नाही."