सहकार भारतीच्यावतीने नूतन जिल्हाध्यक्ष अंगडी यांचा सत्कार

विजयपूर :  भाजपाच्या जिल्हाध्यक्षपदी निवड झालेल्या गुरुलिंगप्पा अंगडी यांचा सत्कार सहकार भारती संघटनेच्या वतीने करण्यात आला. या सत्कार समारंभास सहकार भारतीचे जिल्हाध्यक्ष श्रीहर्षगौडा पाटील, विभागीय कार्यदर्शी सुभाष इंडी, जिल्हा सचिव परशुराम चिंचली, जिल्हा संघटना सचिव दीपक शिंत्रे, श्री सिद्धेश्वर सहकारी बँकेचे अध्यक्ष विजयकुमार इजेरी, मर्चंट असोसिएशनचे अध्यक्ष रविंद्र बिज्जरगी, सिद्धेश्वर सहकारी बँकेचे संचालक मंडळाचे सदस्य अमित नायवाडी व इतर मान्यवर उपस्थित होते.कार्यक्रमात सहकार भारतीच्या पदाधिकाऱ्यांनी अंगडी यांचे अभिनंदन करून त्यांच्या भावी कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या. अंगडी यांनी सहकार क्षेत्राच्या प्रगतीसाठी आपले योगदान देण्याची ग्वाही यावेळी दिली. त्यांनी सहकार चळवळीला पुढे नेण्याचा निर्धार व्यक्त केला.