शोकवार्ता: माळशिरस तालुक्याच्या पानीव गावाचे सुपुत्र हवालदार यशवंत बाबर यांचे वीरमरण

सोलापूर :-
सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातील पानीव गावाचे सुपुत्र व भारतीय लष्करातील हवालदार यशवंत भानुदास बाबर (वय ५५) यांना कोची (केरळ) येथे ड्युटीवर असताना हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने वीरमरण प्राप्त झाले. गेल्या ३५ वर्षांपासून भारतीय लष्करात सेवा बजावत असलेल्या बाबर यांची नुकतीच बदली कोची येथे झाली होती. येणाऱ्या एका वर्षातच त्यांची सेवानिवृत्ती होणार होती, परंतु त्याआधीच ते कर्तव्य बजावत असताना देशासाठी शहीद झाले.

सेवा कारकीर्द:

  • १५ वर्षे जम्मू-काश्मीरमध्ये सेवा, संवेदनशील सीमेवर कर्तव्य बजावले
  • जैसलमेर, पुणे, सिकंदराबाद, जबलपूर व इतर भागांत कर्तव्य
  • प्रशिक्षण व प्रशासकीय जबाबदाऱ्या समर्थपणे पार पाडल्या

त्यांच्या निधनामुळे पानीव गाव, माळशिरस तालुका आणि सोलापूर जिल्हा शोकमग्न झाला आहे. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, एक मुलगा, एक मुलगी व भाऊ असा परिवार आहे. गावाने एक शूर, निष्ठावान सैनिक गमावला आहे.

अंतिम विधी:

मंगळवारी रात्री त्यांचे पार्थिव पुण्याला पोहोचणार असून, तेथून पानीव येथे आणले जाईल. बुधवारी सकाळी १० वाजता लष्करी इतमामात अंत्यसंस्कार होणार आहेत. पानीव ग्रामपंचायत प्रशासन यासाठी सर्व व्यवस्था करत आहे.