' संचार ' चे सचिन वायकुळे यांचा कोल्हापुरात दिपगंगा भगीरथी राज्यस्तरीय पुरस्काराने गौरव

बार्शी:  उल्लेखनीय कार्याबद्दल व लेखनाबद्दल 'संचार ' चे सचिन वायकुळे यांना कोल्हापुरात दीपगंगा भागीरथी राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. शारदा वृद्ध सेवाश्रम कोल्हापूर व सांगली यांच्या वतीने शाहू स्मारक सभागृहात श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांच्या उपस्थितीत प्रारंभी या पुरस्कार सोहळ्याचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी आजवर केलेल्या सामाजिक कामाबद्दल तसेच उत्तम लेखनाबद्दल सचिन वायकुळे यांचा यावेळी राज्यस्तरीय पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. पुण्याच्या समाजकल्याण विभागाचे सहायक आयुक्त विशाल लोंढे व चंद्रकांत निकाडे यांच्या हस्ते हा सन्मान करण्यात आला. यावेळी संस्थेचे प्रमुख दीपक लोंढे , शारदा लोंढे , हरकचंद सावला, सांगली महापालिका वैद्यकीय अधिकारी डॉ. रवींद्र ताटे, युवराज पाटील , आर्यदीप लोंढे तसेच निवृत्त तहसीलदार मदनराव वायकुळे आदी उपस्थित होते.