एस. टी. बस थांबासमोर अपघाताची शक्यता
.jpeg)
सोलापूर, दि. ११-
स्मार्ट सिटी अंतर्गत रंगभवन ते जिल्हा न्यायालयापर्यंत गटार बांधून त्यावर लोखंडी जाळी लावण्यात आली होती. त्यावरील काही जाळी चोरीस गेल्या असून अक्कलकोटकडे जाणाऱ्या एसटी थांबासमोर गटार उघडी असल्यामुळे गटारीत पाय अडकून प्रवाशांचा अपघात होण्याची शक्यता वाढली आहे.
स्मार्ट सिटी अंतर्गत शहरात झालेल्या अनेक प्रकल्पांची वाट लागली आहे. त्यापैकीच रंगभवन ते जिल्हा न्यायालयापर्यंतच्या गटारीचीही दुर्दशा झाली आहे. पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठी गटार बांधून त्यावर लोखंडी जाळी बसविण्यात आली होती. परंतु त्यावरील अनेक जाळी सध्या चोरीस गेल्याने गटार उघडी पडली आहे. याच मार्गावर अक्कलकोटकडे जाणाऱ्या एसटी गाड्या थांबतात. रंगभवन एसटी थांब्यासमोरच गटार उघडी असल्याने एसटी आल्यानंतर जागा पकडण्यासाठी धावपळ करणाऱ्या प्रवाशांचे पाय गटारीत अडकून येथे अपघात होऊ शकतो. त्यामुळे गटारीवर लोखंडी जाळी बसविण्याची मागणी नागरिकांमधून करण्यात येत आहे.
सध्या महापालिकेकडून शहरातील प्रमुख रस्त्यांवर स्वच्छता अभियान चालू आहे. परंतु रंगभवन ते जिल्हा न्यायालयाकडे जाणाऱ्या
छाया : प्रशांत खरटमल
रस्त्यावरील तुंबलेल्या गटारीतील अस्वच्छता सर्वांना खटकणारी आहे. स्मार्ट सिटीच्या अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देऊन होणारा संभाव्य धोका टाळावा, अशी नागरिकांची अपेक्षा आहे.