डॉलरसमोर रुपया गाळात

मुंबई : मागील काही दिवसांपासून शेअर बाजारात मोठ्या प्रमाणात घसरण दिसत आहे. रोज नव नवीन घसरणीचा विक्रम शेअर बाजारात होत आहे. बाजाराप्रमाणेच भारतीय चलन रुपयाचे ही मोठ्या प्रमाणात अवमूल्यन झाले आहे. आज रूपयांचे यूएस डॉलरच्या तुलनेत 23 पैसे अवमूल्यन झाल्याचे समोर येत आहे.त्यामुळे 1 डॉलरच्या तुलनेत रुपया 86.27 स्तरावर आला आहे. ही रुपयाची सर्वात नीचांकी पातळी आहे. या अवमुल्यनाचे कारण काय आणि सामान्य माणसांवर काय परिणाम होईल हे जाणून घेऊया. रुपया अवमूल्यनाची कारणे परदेशी गुंतवणुकदारांनी सुरु ठेवलेली शेअरची विक्री त्यामुळे केवळ शेअर बाजारावर परिणाम होत नसून तर रुपयाचेही अवमूल्यन होत आहे. तसेच यूएस फेड रिझर्व्ह पॉलिसी रेट कमी वेळा कपात करण्याची शक्यताही एक कारण आहे. दरम्यान, परदेशी गुंतवणूकदार हे जगभरातील बाजारातून गुंतवणूक कमी करत आहेत आणि अमेरिकेच्या बाजाराला प्राधान्य देत आहे.