वारीदरम्यान मृत्यू झाल्यास 4 लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय

मुंबई: पंढरपूर आषाढी वारीदरम्यान वारकर्यांच्या सुरक्षेसाठी
महत्त्वपूर्ण निर्णय घेत राज्य सरकारने एक नवा आर्थिक मदत योजनेचा आदेश जारी केला
आहे. या निर्णयानुसार, 16 जून ते 10 जुलै 2025 या कालावधीत वारीमध्ये सहभागी
असलेल्या कोणत्याही वारकर्याचा अपघात, विषबाधा अथवा अन्य नैसर्गिक
कारणामुळे मृत्यू झाल्यास त्यांच्या वारसांना 4 लाख रुपयांची तातडीची आर्थिक मदत
देण्यात येणार आहे. संचार
याशिवाय, अपघातामुळे गंभीर अपंगत्व आल्यास देखील आर्थिक मदतीची तरतूद
करण्यात आली आहे. मात्र, आत्महत्येच्या घटनांना या योजनेतून
वगळण्यात आले आहे. राज्यात दरवर्षी लाखो भाविक
वारीसाठी पंढरपूरकडे पायी दिंड्या नेतात. यामध्ये अपघात, आरोग्याच्या समस्या यांमुळे काही दुर्दैवी घटना घडत असतात.
त्यामुळे अशा प्रसंगी कुटुंबीयांना तातडीची मदत मिळावी, या हेतूने सरकारने ही योजना जाहीर केली आहे. संचार