सिडनी कसोटीत रोहित विश्रांती घेणार

▶ नवी दिल्ली, दि. २-
रोहित शर्मा ऑस्ट्रेलियाविरुध्दच्या सिडनीमध्ये होणाऱ्या
पाचव्या कसोटी सामन्यात खेळताना दिसणार नाही. त्याने स्वतःला संघाबाहेर ठेवण्याचा
निर्णय घेतला आहे. रोहितच्या जागी जसप्रीत बुमराह संघाचे नेतृत्व करताना दिसणार
आहे. यासह शुभमन गिल पुन्हा एकदा संभाव्य संघाचा भाग होईल. तर पाचव्या कसोटीत
आकाशदीपच्या जागी प्रसिध्द कृष्णाला संधी मिळू शकते. गौतम गंभीरने रोहित शर्मा
सिडनी कसोटीत खेळणार की नाही, या प्रश्नावर दिलेल्या उत्तरानंतर रोहित
शर्माच्या अखेरच्या कसोटी खेळण्याबाबत संभ्रम होता. यानंतर सोशल मीडियावर
भारताच्या सराव सत्रादरम्यानचे अनेक व्हिडिओ फोटो समोर आल्याने रोहित शर्मा ही
कसोटी खेळेल की नाही म्हणणारे बऱ्याच पोस्ट व्हायरल झाल्या होत्या, पण आता रोहित शमनि स्वतःच निर्णय घेतला असल्याचे समोर आले आहे.
रोहितने प्रशिक्षक गौतम गंभीर आणि निवड समितीचे अध्यक्ष अजित आगरकर यांना त्याची संभाव्य संघामधील निवड रद्द करण्याच्या निर्णयाची माहिती दिली आहे आणि या निर्णयावर या दोघांनी सहमती दर्शवली आहे.रोहितच्या या निर्णयाचा अर्थ असाही होऊ शकतो की मेलबर्नमधील बॉक्सिंग डे कसोटी रोहितची भारतासाठी शेवटची ठरली असावी, कारण यानंतर इंग्लंडच्या दौऱ्यापासून सुरू होणाऱ्या पुढील जागतिक कसोटी चॅम्पियनशीप चक्रामध्ये योजनांमध्ये रोहित शर्मा संघाच्या योजनांचा भाग नसू शकतो. सध्याच्या चक्रात भारत डब्ल्यूटीसी फायनलसाठी पात्र ठरण्याची शक्यता फारच कमी आहे. रोहित शर्माच्या जागी आता संघात शुभमन गिलला प्लेइंग इलेव्हनमध्ये संघी मिळणार आहे. मेलबर्न कसोटीत शुभमन गिलला वगळण्यात आल्यानंतर पत्रकार परिषदेत सहायक प्रशिक्षक अभिषेक नायर यांना त्यासंदर्भात प्रश्न विचारण्यात आले होते. दरम्यान पाठीच्या दुखण्यामुळे वेगवान गोलंदाज आकाश दीप सिडनी कसोटीत खेळू शकणार नाही. त्याच्याऐवजी हर्षित राणाला संधी मिळणार का प्रसिध्द कृष्णाला याविषयी उलटसुलट चर्चा सुरू होत्या. हर्षित राणा पर्थ कसोटीत खेळला होता. मात्र, प्रदीर्घ स्पेल टाकल्यानंतर त्याची दमछाक उडाली होती. त्यामुळे सिडनी कसोटीत प्रसिध्द कृष्णाला अंतिम अकरात खेळवण्यात येणार आहे.