ब्रिस्बेन कसोटीतही रोहित मधल्या फळीतच उतरणार
.jpeg)
ॲडिलेड, दि. १०-ॲडिलेड, दि. १०-
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील गुलाबी चेंडूवरील कसोटी सामना भलेही संपला असेल, मात्र खेळाडू अद्यापही ॲडिलेडमध्ये नेटसवर कसून सराव करत आहेत. दिवस- रात्र कसोटी सामना केवळ दोन दिवस व एका सत्रातच संपल्यानंतर विराट कोहली, रोहित शमां, शुभमन गिलसारख्या खेळाडूंनी तिसऱ्या कसोटीसाठी ब्रिस्वेनचे विमान पकडण्यापूर्वीॲडिलेडमध्ये जोरदार सराव केला. याचवेळी कर्णधार रोहित शर्मा तिसऱ्या कसोटीतही मधल्या फळीतच फलंदाजीला मैदानावर उतरेल असे संकेत मिळाले.
गावामध्ये खेळल्या जाणाऱ्या तिसऱ्या कसोटीपूर्वी कर्णधार रोहित शर्माच्या फलंदाजीच्या स्थानावरून मोठा वाद सुरू झाला आहे. दुसऱ्या कसोटीपासून संघासोबत जोडलेला रोहित
डिलेड, दि. १०-
डिलेड, दि. १०-
आपली सलामीची जागा सोडून ॲडिलेडमध्ये सहाव्या स्थानावर उतरला होता. ज्यामध्ये तो सपशेल अपयशी ठरला. तरीही भारतीय कर्णधार आपल्या फलंदाजीच्या
स्थानात कोणत्याही प्रकारच्या बदलाच्या मूडमध्ये दिसून येत नाही. रोहितने गुलाबी चेंडूवरील कसोटी सामन्यात यासाठी सहाव्या स्थानावर फलंदाजी केली
होती, जेणेकरून केएल राहुल व यशस्वी जैस्वालची जोडी कायम राहील. राहुल यशस्वीने पर्थमध्ये खेळल्या गेलेल्या मालिकेतील पहिल्या सामन्यात दुसऱ्या डावात ऐतिहासिक भागीदारी रचताना सलामीचे अनेक विक्रम मोडले होते. मात्र दुसऱ्या कसोटीत दोघेही धावा काढण्यात अपयशी ठरले होते. ज्यामुळे ही चर्चा सुरू झाली होती की, हिटमॅनला आपल्या सुरूवातीच्या स्थानावर फलंदाजीसाठी पाठविले गेले पाहिजे. मात्र असे वाटते की, रोहित कमीत कमी आणखी एका सामन्यासाठी मधल्या फळीत खेळण्यासाठी इच्छुक आहे.
मंगळवारीॲडिलेडमध्ये भारताच्या सराव सत्रादरम्यान
पाहण्यात आले की, दुसऱ्या कसोटी सामन्यातील फलंदाजी क्रमात कोणताही बदल झालेला नाही. खेळाडू त्याच क्रमाने फलंदाजीचा सराव करत असल्याचे दिसून आले, ज्या क्रमाने ॲडिलेडमध्ये उतरले होते. विराट कोहलीने आपल्या बँकफुटवर काम करण्यासह फ्रंटफुटवर चेंडूला दावण्याचा व त्यानंतर स्लिपमध्ये झेल घेण्याच्या सरावावरही भर दिला. केएल राहुल व यशस्वी जैस्वाल प्रथम फलंदाजीसाठी आले. त्यानंतर विराट कोहली, रोहित शर्मा व ऋषभ पंत आले. हा फलंदाजीचा क्रम असे दर्शवितो की, रोहित गावामध्येही मधल्या फळीतच उतरणार आहे.