पत्नीचा विरोध असल्याने ऋषिराजचा बॅकॉक टूर फसला; तानाजी सावंत यांनी वापरले वजन

पुणे: पत्नीचा विरोध डावलून बॅकॉकला जाण्याचे नियोजन करणाऱ्या ऋषिराज सावंत याचा प्रयत्न माजी मंत्री तानाजी सावंत यांनी आपले राजकीय वजन वापरून हाणून पाडल्याचे सांगण्यात येत आहे.  सुमारे एक महिन्यापूर्वी बॅकअप दौऱ्याचे केलेले नियोजन ऋषिराज यांच्या पत्नीच्या टोकदार विरोधामुळे फसल्याचे सांगण्यात येत आहे. आपला मुलगा घरातून निघून गेल्याची कुण कुण लागताच तानाजी सावंत यांनी थेट केंद्रीय हवाई वाहतूक मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्याशी संपर्क साधून विमान बॅकॉक ला पोहोचण्यापूर्वीच परस्पर माघारी आणण्यात यशस्वी झाल्याची चर्चा आहे. ऋषिराज सावंत बँकॉकला जाण्यासाठी 9 जानेवारी रोजी ग्लोबल हँडलिंग सर्व्हिसेस या कंपनीचे विमान बूक केले. यासाठी त्यांनी तब्बल 68 लाख रुपये खर्च केले. एवढे करूनही ऋषिराजला बँकॉकला जाता आले नाही. कारण त्याने बँकॉकला जाणे हे त्याच्या पत्नीला तसेच वडिलांना मान्य नव्हते. मात्र ऋषिराजने कोणाचेही न ऐकता त्याचे दोन मित्र संदीप वसेकर आणि प्रवीण उपाध्ये या दोघांना सोबत घेऊन पुण्यावरून बँकॉकसाठी निघाला. ऋषिराजने उड्डाण केल्याचे समजताच तानाजी सावंत यांनी त्यांच्या राजकीय ताकदीचा वापर सुरू केला. तानाजी सावंत यांनी सर्वप्रथम माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना संपर्क केला, मात्र त्यांच्याकडून फारसा प्रतिसाद मिळाला नाही. त्यानंतर त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना संपर्क करण्याचा प्रयत्न सुरू केला. यावेळी त्यांनी चिंचवड येथील भाजप आमदार शंकर जगताप यांची मदत घेतली. त्यांच्यामार्फत मुख्यमंत्र्यांशी संपर्क झाला आणि वेगाने पुढील सूत्रे फिरण्यास सुरू झाली. मुरलीधर मोहोळ यांनी डायरेकटर जनरल ऑफ सिव्हिल एव्हिएशन कार्यालयाला सूचना केली. तिथून एअर ट्राफिक कंट्रोलला सूचना देण्यात आल्या. एअर ट्रॅफिक कंट्रोलकडून विमानाचे पायलट परीक्षित अग्निहोत्री आणि श्रेष्ठ अग्निहोत्री यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न सुरु झाला. तोपर्यंत हे विमान बंगालच्या उपसागरावर पोहोचले होते. एअर ट्राफिक अथॉरिटीकडून या दोन्ही पायलट्सना परत फिरण्याच्या सूचना देण्यात आल्या. मात्र ही बाब विमानात पाठीमागे बसलेल्या ऋषीराजला कळू देण्यात आली नाही.  माजी मंत्री तानाजी सावंत यांचा मुलगा ऋषिराज सावंत याचे काल पुण्यातून अपहरण झाल्याची बातमी समोर आली होती. त्यानंतर तो बँकॉकला जात असल्याचे समोर आले. यासाठी ऋषिराज सावंतने विमान बूक केले. या विमानासाठी त्याने तब्बल 68 लाख रुपये मोजले. मात्र, ऋषिराज सावंतने बँकॉकला जाणे हे त्याच्या पत्नीला तसेच वडील तानाजी सावंत यांना मान्य नव्हते. त्यानुसार तानाजी सावंत यांनी त्यांची पूर्ण राजकीय ताकद पणाला लावल्याचे दिसले.