आगामी नगरपालिका निवडणुकीत शिवशक्ती, भीमशक्तीचा उदय ?

कुडूवाडी नगर परिषदेवर असलेल्या प्रशासकीय कालावधीला नुकतीच तीन वर्षे पूर्ण झाली. प्रशासकीय काळाचा हा आतापर्यंतचा सर्वात मोठा कालावधी समजला जाईल. कारण अजूनही निवडणुका कयी जाहीर होतील, हे सांगणे आजतरी कठीण आहे. ही निवडणूक जेव्हा होईल तेव्हा होईल पण या निवडणुकीवर नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणूक निकालाचा परिणाम होणार का, हे येणारा काळच ठरवेल. ही निवडणूक कोणा एका गटासाठी सहज व सोपी असेल असे वाटत नाही. त्यामुळे शहरात पुन्हा शिवशक्ती, भीमशक्ती आणि मुस्लीम बांधवांच्या ताकदीचा प्रत्यय येऊ शकतो. विधानसभेत सर्वत्र महायुतीला कौल मिळाला पण विसर्जित कुईवाडी नगर परिषदेत याउलट परिस्थिती होती. सद्य स्थितीतील शिवसेनेच्या उबाठा गटाचे वर्चस्व होते. गेल्या तीस वर्षांतील पाच वर्षे वगळता या गटाचीच सत्ता होती. कुईवाडी शहरात शिवसेना उबाठा गटाचे धनंजय डिकोळे, रिपाइंचे बापूसाहेब जगताप व माजी नगराध्यक्ष समीर मुलाणी यांचे वर्चस्व राहिले आहे. तर तत्कालीन राष्ट्रवादी हा विरोधी पक्ष म्हणून कार्यरत होता. गेल्या तीस वर्षात तालुक्यात माजी आमदार शिंदे बंधूचे प्राबल्य राहिले. परंतु, नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले तर करमाळा-माढा मतदारसंघात नारायण पाटील हे निवडून आले आहेत. विधानसभा प्रचारावेळी कुड्डूवाडीतील कार्यकर्त्यांनी खासदार पैर्यशील मोहिते-पाटील यांच्या उपस्थितीत नारायण पाटलांकडे नगर परिषद निवडणुकीत तिसरी आघाडी करून लढवू अशी मागणी केली होती. निकालानंतर नारायण पाटील यांनी अद्याप तरी कुडूवाडीला भेट दिली नाही. त्यातच सत्ता महायुतीची आणि आमदार विरोधी पक्षाचे अशा परिस्थितीत कुडूवाडीच्या समस्या सोडवणे आणि विकासकामासाठी निधी खेचून आणणे जिकिरीचे ठरणार आहे.

तर दुसरीकडे संपूर्ण माढा तालुक्यातील सत्तास्थाने ताब्यात असणाऱ्या शिंदे बंधूंना पराभव स्वीकारावा लागल्याने आगामी काळात कुडूवाडीच्या निवडणुकीत ते भाग घेणार का, असाही प्रश्न निर्माण झाला आहे. विधानसभा निवडणुकीत करमाळ्याचे माजी आमदार संजयमामा शिंदे व माढ्याचे माजी आमदार बबनदादा शिंदे यांच्या चिरंजीवांचा पराभव झाला. त्यामुळे आगामी काळात शिंदे बंधूना राजकीय अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी कोणतीही निवडणूक हलक्यात घेऊन चालणार नाही. ताकद असतानाही कायम दुय्यम स्थानी राहणाऱ्या आपल्या कार्यकत्यांना बळ दिले पाहिजे आणि यावेळी शिंदेबंधू पुन्हा तेवढ्याच ताकदीने करमाळा-कुईवाडीसह माडपातील सर्व सतास्थाने काबीज करण्याचा प्रयत्न करतील. ही त्यांचे आस्तित्व टिकवण्यासाठीची लढाई असणार आहे. आमदार पाटील हे मागील काळात ज्यावेळी शिवसेनेकडून आमदार होते त्यावेळीही आमदार पाटील आणि येथील शिवसैनिक यांच्यात फारसे कधी जुळले नाही. त्यामुळे येणारी निवडणूक ही महाआघाडी म्हणून ते लढवतील हे द्रापास्तच आहे. केंद्रात व राज्यात सगळीकडे बोलबाला असणाऱ्या भाजपला अजूनही इथे महणावा असा सक्षम केडर नाही. त्यामुळे भाजपला अद्यापही पाय रोवता आला नाही. महायुतीतील बागलगट आणि भाजप एकत्र येत ही निवडणूक लढवतील की स्थानिक पातळीवर काही वेगळा निर्णय भाजप घेणार हे देखील पाहाणे औत्सुक्याचे ठरणार आहे. तर रिपाई आठवले गटाची स्वतंत्र अशी ताकद असून रेल्वे वसाहतींमधून त्यांचे चार उमेदवार निवडून येतात. गेल्या पंचवार्षिक काळात कुईवाडी नगरपालिकेतील अनुभव पाहता यंदाची नगरपालिका निवडणूक ही प्रस्थापितांच्या अस्तित्वाची असणार आहे. तर काहींना अस्तित्व निर्माण करण्यासाठी झगडावे लागणार आहे. ही निवडणूक कोणा एका गटासाठी सहज व सोपी असेल असे वाटत नाही. त्यामुळे शहरात पुन्हा शिवशक्ती, भीमशक्ती आणि मुस्लीम बांधवांच्या ताकदीचा प्रत्यय येऊ शकतो.