महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची राधाश्री निवास येथे सदिच्छा भेट; डॉ. सूर्यप्रकाश कोठे यांच्या कार्याचे कौतुक

महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सोलापूर शहरातील मुरारजी पेठ येथील राधाश्री निवास येथे सदिच्छा भेट दिली. प्रख्यात गॅस्ट्रोलॉजिस्ट डॉ. सूर्यप्रकाश कोठे यांच्या विशेष निमंत्रणावरून आयोजित या भेटीदरम्यान कोठे परिवारातर्फे मंत्री बावनकुळे यांचे पारंपरिक पद्धतीने स्वागत करण्यात आले. या प्रसंगी परिवारातील महिलांनी विठ्ठल-रुक्मिणीची मूर्ती देऊन महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा सत्कार केला. तसेच ग्रामविकास मंत्री व सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांचे औक्षण करून स्वागत करण्यात आले. या कार्यक्रमाला शहरातील विविध मान्यवर आणि भाजप पदाधिकारी उपस्थित होते. यामध्ये आमदार देवेंद्र कोठे, नगरसेवक प्रथमेश कोठे, आमदार सचिन कल्याणशेट्टी, भाजप महिला अध्यक्षा रोहिणी तडवळकर, भाजप प्रदेश कार्यकारिणी सदस्य शहाजी पवार, उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर, मनीष देशमुख, रंजिता चाकोते, श्रीदेवी फुलारे, सुधा अळ्ळीमोरे यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांचा समावेश होता. यावेळी बोलताना महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी डॉ. सूर्यप्रकाश कोठे यांच्या सामाजिक आणि वैद्यकीय क्षेत्रातील कार्याचे विशेष कौतुक केले. “डॉ. कोठे यांचे समाजासाठी मोठे योगदान असून, त्यांनी भविष्यात २०० बेडचे अत्याधुनिक रुग्णालय सुरू करून आरोग्य सेवेत अधिक मोठी भूमिका बजवावी,” असे त्यांनी सांगितले. या भेटीमुळे कोठे परिवारासह भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.