श्री वटवृक्ष मंदिरात ‘देऊळ बंद - २’ चित्रपटाच्या टिझरचे अनावरण
अक्कलकोट येथील श्री वटवृक्ष मंदिरात स्वामी समर्थांच्या
अवतार कार्यावर आधारित ‘देऊळ बंद - २’ या मराठी चित्रपटाच्या टिझरचे अनावरण
भक्तिमय वातावरणात करण्यात आले. यापूर्वी प्रदर्शित झालेल्या ‘देऊळ बंद’
चित्रपटाला राज्यभरातील स्वामी भक्तांकडून मोठा प्रतिसाद मिळाला होता. आता या
चित्रपटाचा पुढील भाग प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. या अनावरण सोहळ्यास दिग्दर्शक
तथा अभिनेते प्रविण तरडे, अभिनेत्री स्नेहल तरडे, ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी तसेच निर्माते कैलाश वाणी, जयश्री वाणी, कैवल्य वाणी आणि जुईली वाणी उपस्थित
होते. श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे अध्यक्ष महेश इंगळे आणि प्रथमेश
इंगळे यांच्या हस्ते ऑनस्क्रीन बटन दाबून टिझरचे अनावरण करण्यात आले. यावेळी
उपस्थित मान्यवरांनी मनोगत व्यक्त करत २१ मे रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित
होणारा हा चित्रपट स्वामी भक्तांनी अवश्य पाहावा, असे आवाहन
केले.
कार्यक्रमास मंदिर समितीचे सचिव आत्माराम घाटगे, विश्वस्त महेश गोगी, मंदार महाराज पुजारी, श्रीशैल गवंडी, प्रा. शिवशरण अचलेर, कोरिओग्राफर नंदकुमार जाधव, कुणाल मांजरेकर, चैतन्य दळवी, प्रद्युम्न जोशी, अभियंता नवनाथ बनकर, सुनिल नाईकवडी, सागर गोंडाळ यांच्यासह चित्रपटाची संपूर्ण टीम आणि मोठ्या संख्येने भाविक
उपस्थित होते. यावेळी बोलताना अभिनेते मोहन जोशी म्हणाले की, “श्री स्वामी समर्थांची भूमिका साकारण्याचा अनुभव माझ्यासाठी मोठा आशीर्वाद
ठरला. ‘देऊळ बंद - २’ मध्ये शेतकरी कुटुंबाने घेतलेल्या देवाच्या परीक्षेवर आधारित
अद्भुत प्रसंग दाखवण्यात आले असून हा विषय स्वामी भक्तांना निश्चितच भावेल.”