रेवप्पा कोळी यांना अर्थशास्त्र विषयात पीएच.डी पदवी प्रदान

सोलापूर:- सोलापूर येथील संगमेश्वर एज्युकेशन सोसायटी संचलित,संगमेश्वर महाविद्यालय सोलापूर येथे गेल्या 21 वर्षापासून
शिक्षकेतर कर्मचारी म्हणून त्यासोबत संगमेश्वर रात्र महाविद्यालयामध्ये प्राध्यापक
म्हणून कार्यरत असलेले रेवप्पा सिद्धप्पा कोळी यांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर
सोलापूर विद्यापीठातून अर्थशास्त्र या विषयातील पीएच. डी पदवी प्रदान करण्यात आली.
त्यांना वसुंधरा कला महाविद्यालय सोलापूर येथील प्रा. डॉ. राजाराम पाटील यांचे
मार्गदर्शन लाभले. त्यांनी "सोलापूर जिल्ह्यातील सेवक सहकारी पतसंस्थांचा
विश्लेषणात्मक अभ्यास" या विषयावर शोधप्रबंध सादर केला. यावेळी मौखिक
परीक्षेचे अध्यक्ष म्हणून प्रा. डॉ. बी. एच.दामजी, बहिस्त
पर्यवेक्षक l प्रा. डॉ. सुनील नरवडे,( छत्रपती
संभाजी नगर ) प्रा. डॉ. जम्मा अविनाश, प्रा. डॉ.कांबळे
एम.बी. उपस्थित होते. या मिळवलेल्या यशाबद्दल संगमेश्वर महाविद्यालयाचे अध्यक्ष
धर्मराज काडादी, सचिव ज्योती काडादी, प्राचार्य
ऋतुराज बुवा, प्राचार्य डॉ. एस.डी.गोटे ( संगमेश्वर रात्र
महाविद्यालय सोलापूर ) उपप्राचार्य एस एस पाटील, प्रा. वांगी
एस. एस, प्रा. काळे एम. के, प्रा.
कुलकर्णी एस. पी. यांच्यासमवेत प्राध्यापक प्राध्यापिका शिक्षकेतर कर्मचारी यांनी
अभिनंदन केले. डॉ.रेवप्पा कोळी यांनी अर्थशास्त्र विषयातून सेट,नेट परीक्षा उत्तीर्ण असून आपल्या यशाचे श्रेय कुटुंबीय, मित्र,प्राध्यापक, शिक्षक आणि
सहकाऱ्यांना दिल्या आहेत. या मिळवलेल्या उत्तुंग यशाबद्दल सर्व स्तरातून त्यांचे
कौतुक होत आहे.