सेवापुर्ती निमित्त प्रा.वैजनाथ हत्तुरे यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव

सोलापूर:- श्री मल्लिकार्जुन हायस्कूल व
रखमाबाई हत्तुरे कनिष्ठ महाविद्यालयाचे आदरणीय प्राचार्य श्री वैजिनाथ हत्तुरे
यांचा सेवानिवृत्तीनिमित्त सत्कार श्री
मल्लिकार्जुन हायस्कूल व रखमाबाई हत्तुरे कनिष्ठ महाविद्यालयाचे आदरणीय
प्राचार्य श्री वैजिनाथ हत्तुरे शासकीय
नियतवयोमानानुसार 31 वर्षे सेवा करून सेवानिवृत्त झाले. या कार्यक्रमाच्या
अध्यक्षस्थानी मजरेवाडी शिक्षण प्रसारक
मंडळाचे अध्यक्ष श्री सिद्धप्पा वरनाळ होते,प्रमुख अतिथी म्हणून
संस्थेचे सचिव श्री नागप्पा सिंदगी व श्री धरेप्पा हत्तुरे,सौ.नागुबाई
हत्तूरे ,सौ.राजश्री हत्तुरे,सौ.विजयालक्ष्मी
हत्तुरे यांची उपस्थिती होती.
सत्कार मूर्तींचे स्वागत पुष्पवृष्टीने व
ढोल ताशांच्या गजरात जल्लोषात करण्यात आले.तसेच रांगोळीच्या व गुलाब पुष्पांच्या
पायघड्या काढण्यात आल्या होत्या.प्रथमतः स्काऊट गाईड विद्यार्थ्यानी
सत्कारमूर्तीना मानवंदना दिली. यावेळी सत्कारमूर्ती व प्रमुख अतिथी यांच्या
शुभहस्ते सरस्वती मातेचे, कै.सिद्रामप्पा
हत्तुरे,कै.रखमाबाई हत्तुरे यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात
आले. प्राचार्यांच्या शुभहस्ते प्रमुख अतिथींचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार
करण्यात आला. सत्कारमूर्तींचा प्राथमिक,माध्यमिक व उच्च
माध्यमिक विभागातर्फे सपत्निक सत्कार प्रमुख अतिथींच्या शुभहस्ते फेटा,शाल व पुष्पगुच्छ देऊन करण्यात आला. याप्रसंगी युसुफ शेख,बसवेश्वर
बुरुकुल,सविता कुलकर्णी यांनी अनुभव सांगत सत्कारमूर्तीच्या
आठवणींना उजाळा दिला.
यावेळी प्रमुख अतिथी संस्थेचे सचिव
नागप्पा सिंदगी यांनी आपल्या मनोगतात सेवानिवृत्त झाले तरी सर्व शिक्षकांना
मार्गदर्शन करावे असे सांगितले व त्यांच्याकडून सर्वांनी प्रेरणा घ्यावी असे
म्हटले. सत्कारमूर्ती वैजिनाथ हत्तुरे यांनी आपल्या मनोगतात मी शेवटच्या
श्वासापर्यंत शाळेसाठी व विद्यार्थ्यांसाठी प्रगतीसाठी सहकार्य करणार आहे असे
आश्वासन दिले.संस्कारक्षम पिढी तयार करावे,आंतरराष्ट्रीय
दर्जाचे नामवंत खेळाडू तयार व्हावे व विविध स्कॉलरशिप परीक्षेमध्ये विद्यार्थी
पात्र व्हावे, सर्वांनी उमेदीने व उत्साहाने जीवन जगावे अशी
अपेक्षा व्यक्त केली,तसेच सत्कार केल्याबद्दल सर्वांचे आभार
मानले. अध्यक्षीय मनोगतातून माननीय
सिद्धप्पा वरनाळ यांनी प्राचार्यांची स्वभाव वैशिष्ट्ये सांगताना निर्मळ मनाचे,
चारित्र्यवान,प्रेमळ स्वभावाचे व्यक्ती आहेत
अशा भावना व्यक्त केल्या व पुण्यवान व परोपकारी वृत्ती जोपासणारी व्यक्ती आहे असे
म्हटले.तसेच त्यांच्या कार्याचा आढावा घेत शिक्षण क्षेत्रातील महत्वाच्या
कार्यांचा उल्लेख करत भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रमास पर्यवेक्षक रमेश दिंडोरे,काशिनाथ मळेवाडी,सुधाकर कामशेट्टी,प्राथ.चे मुख्याध्यापक सचिन जाधव,बालक मंदिरच्या मुख्याध्यापिका हुमनाबादकर मॅडम,हत्तुरे कुटुंबीय,अण्णाराया तुप्पद, भारत राऊत,अनिता हौदे,ॲड.नागेश पाटील,लक्ष्मीकांत पनशेट्टी,विनायक हत्तुरे,रितेश हत्तुरे ,सेवानिवृत्त शिक्षक आदी उपस्थित होते. हे कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी क्रीडा शिक्षक गंगाराम घोडके,परमेश्वर चांदोडे, गणेश कोरे,महेश चिवरे,अमरनाथ कदारे, संतोष स्वामी आदी शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक बसवराज कोरे यांनी केले,सूत्रसंचालन मारुती माने व सुकेशनी गंगोडा यांनी केले,तर अनिलकुमार गावडे यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले.