केंद्र सरकारची महाराष्ट्र शासनाने बंद केलेली ‘एक रुपयात पिक विमा योजना’ पुन्हा सुरू करा.

केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी लागू केलेली ‘एक रुपयात पीक
विमा योजना’ बंद केल्याच्या निषेधार्थ खासदार प्रणिती शिंदे यांच्या नेतृत्वाखाली
महाराष्ट्रातील काँग्रेसचे खासदारांनी नवी दिल्लीतील संसद भवन परिसरात जोरदार
निदर्शने करत ही योजना पुन्हा सुरू करण्याची मागणी केली. यावेळी आंदोलनादरम्यान
शेतकरी रडतोय — विमा कंपनी नफा फुगवतेय, शेतकरी आत्महत्या करतोय — सरकार झोपेचे
सोंग घेतोय”, पिक गेले — आश्वासन राहिले, शेतकऱ्यांच्या जीवाशी खेळू नका, फसल विमा योजना
नव्हे — फसवी विमा योजना, कागदावर विमा नको — शेतकऱ्यांच्या
खात्यात थेट पैसे हवेत, पीक विमा योजना — शेतकऱ्यांची लूट,
सरकारचे धोरण कंपन्यांचा फायदा, शेतकऱ्यांच्या
आत्महत्येला सरकार जबाबदार, शेतकरी भरतो हप्ता, विमा कंपन्यांचे उत्पन्न वाढते, शेतकऱ्यांच्या वेदना
ऐका, नाहीतर शेतं ओसाड राहतील, पीक
विमा फक्त धनदांडग्यांसाठी — गरीब शेतकऱ्यांचं काय?, शेतकरी
जगला पाहिजे — हे सरकार बदललं पाहिजे, दूध खरेदीला अनुदान
द्या, शेतकऱ्यांना न्याय द्या, प्रेमियम
घेतलं, नुकसानभरपाई दिली नाही — हिशेब द्या. अशा जोरदार
घोषणांनी संसद भवन परिसर दणाणून गेला.