NDA बैठकीत ‘ऑपरेशन सिंदूर’ व ‘महादेव’च्या यशाचा ठराव मंजूर
-resized-to-1000x666.jpeg)
राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या (NDA) घटक पक्षांची महत्त्वपूर्ण बैठक आज संसद भवनात पार पडली.
बैठकीस पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, भाजप अध्यक्ष जेपी नड्डा, केंद्रीय मंत्री किरेन रिजीजू, प्रल्हाद जोशी, आणि खासदार कंगना रनौत हे उपस्थित होते.
मोदींना ऑपरेशन यशाबद्दल सन्मान:
या बैठकीत नुकत्याच पार पडलेल्या "ऑपरेशन सिंदूर" आणि "ऑपरेशन महादेव" या दोन्ही लष्करी मोहिमांच्या यशस्वी अंमलबजावणीबद्दल एनडीए खासदारांनी एकमताने ठराव मंजूर केला. पंतप्रधान मोदी यांचा यशाबद्दल सन्मान करण्यात आला.
PM मोदींचे आगमन होताच 'हर हर महादेव' आणि 'भारत माता की जय' चा जयघोष झाला.
दहशतवादी हल्ल्यातील बळींना
श्रद्धांजली:
पहलगाम दहशतवादी हल्ल्यात
मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांना श्रद्धांजली वाहण्यात आली व त्यांच्या कुटुंबीयांप्रती सहवेदना व्यक्त
करण्यात आल्या.
उपराष्ट्रपती निवडणुकीच्या
पार्श्वभूमीवर बैठक महत्त्वाची:
- ७
ऑगस्टपासून उपराष्ट्रपती पदासाठी
नामांकन प्रक्रिया सुरू होत आहे.
- २१
ऑगस्ट ही अंतिम तारीख
असल्यामुळे एनडीएकडून उमेदवाराची घोषणा होण्याची शक्यता आहे.
- ९
सप्टेंबर रोजी निवडणूक होऊ शकते, जर विरोधी पक्ष
उमेदवार देत असेल तर.
- संसद
पावसाळी अधिवेशनाचे कामकाज २१ ऑगस्ट रोजीच संपणार आहे.
इतर ठळक मुद्दे:
- नवीन
खासदारांची पंतप्रधान मोदींशी ओळख करून देण्यात आली
- राजनाथ
सिंह यांना पुष्पहार घालून मोदींचे स्वागत