प्रसिद्ध मेंदू विकारतज्ज्ञ डॉ. शिरीष वळसंगकर यांची गोळी झाडून आत्महत्या; सोलापूर वैद्यकीय क्षेत्रात खळबळ

सोलापूर:– प्रसिद्ध मेंदू विकारतज्ज्ञ आणि एस.पी. इन्स्टिट्यूट ऑफ न्यूरो सायन्सेसचे संस्थापक डॉ. शिरीष वळसंगकर (वय ६) यांनी शुक्रवारी रात्री स्वतःच्या डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केली. घरगुती कारणांमुळे त्यांनी हे पाऊल उचलल्याची माहिती समोर येत आहे. या घटनेने सोलापूरच्या वैद्यकीय क्षेत्रात शोककळा पसरली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रात्री .३० च्या सुमारास त्यांनी मोदी परिसरातील आपल्या राहत्या बंगल्यातील बेडरूममध्ये रिव्हॉल्व्हरने दोन गोळ्या डोक्यात झाडल्या. त्यातील एक गोळी डोक्यातून आरपार गेली. कुटुंबीयांनी तातडीने त्यांना रामवाडी येथील त्यांच्या रुग्णालयात दाखल केले, मात्र डॉक्टरांचे सर्व प्रयत्न अपयशी ठरले आणि त्यांचा मृत्यू झाला. डॉ. वळसंगकर यांच्या पश्चात पत्नी स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. उमा, मुलगा न्यूरोलॉजिस्ट डॉ. अश्विन, सून न्यूरोसर्जन डॉ. शोनाली, मुलगी डॉ. स्नेहा, तसेच भाऊ डॉ. सतीश वळसंगकर आणि नातवंडे असा परिवार आहे. ते ज्येष्ठ फिजिशियन डॉ. भैय्यासाहेब वळसंगकर यांचे सुपुत्र होते. त्यांचे शैक्षणिक व व्यावसायिक कार्य अतिशय प्रेरणादायी होते. त्यांनी लंडनच्या रॉयल कॉलेज ऑफ फिजिशियन्समधून एमआरसीपी ही पदवी प्राप्त केली होती. १९९९ मध्ये स्थापन केलेल्या एस.पी. इन्स्टिट्यूट ऑफ न्यूरो सायन्सेस या संस्थेला त्यांनी पश्चिम महाराष्ट्रातील अग्रगण्य न्यूरो केअर सेंटर बनवले. सर्व सुविधा एका छताखाली देण्याच्या दृष्टिकोनातून त्यांनी आधुनिक वैद्यकीय उपकरणे, २४ तास सेवा सुविधा, न्यूरो आयसीयू आदी सुविधा रुग्णालयात उभ्या केल्या होत्या. मराठी, कानडी, इंग्रजी व हिंदी अशा चार भाषांमधील प्रभावी संवाद कौशल्य, आणि स्वतःचे चार्टर विमान असणारे सोलापूरमधील एकमेव डॉक्टर अशी त्यांची ओळख होती.या अकाली जाण्याने वैद्यकीय आणि सामाजिक क्षेत्रात हळहळ व्यक्त होत आहे. पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.