सुप्रसिद्ध वकील हेमा शिंदे यांना कायद्यातील योगदानाबद्दल ‘डॉक्टरेट पदवी’ प्रदान

सोलापूर: महाराष्ट्रातील पहिल्या महिला जिल्हा सरकारी वकील म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ॲड. हेमा शिंदे यांना कायद्यातील गुन्हेगारीविषयक कायदेशीर उपाय या विषयातील विशेष योगदानाबद्दल साऊथ वेस्टर्न अमेरिकन युनिव्हर्सिटीच्या वतीने डॉक्टरेट पदवी प्रदान करण्यात आली. ९ मार्च रोजी गोव्यात झालेल्या विशेष कार्यक्रमात त्यांना ही पदवी प्रदान करण्यात आली.

📌 ॲड. हेमा शिंदे यांचा प्रवास:

  • जन्म: ३० ऑगस्ट १९६१
  • शालेय जीवन: नेतृत्वगुणांसाठी ‘हेमा हेडमास्तर’ म्हणून ओळख
  • कायद्याचे शिक्षण पूर्ण: १९४ मध्ये लातूर जिल्हा न्यायालयातून वकिलीला सुरुवात
  • १९: सोलापुरात वकिली सुरू करून पक्षकारांचा विश्वास संपादन केला
  • १९९६: सरकारी वकील म्हणून नियुक्ती
  • २०००: पहिल्या महिला जिल्हा सरकारी वकील होण्याचा मान मिळवला

 महत्त्वाची कामगिरी:

  • सोलापुरातील दंगलीदरम्यान निष्पाप लोकांना सोडवण्यासाठी न्यायालय रात्री उशिरापर्यंत सुरू ठेवले.
  • ३५ वर्षांच्या प्रदीर्घ अनुभवात दिवाणी आणि फौजदारी क्षेत्रात वेगळी ओळख निर्माण केली.
  • सरकारी बाजू सक्षमपणे मांडत अनेक गुंतागुंतीचे खटले यशस्वीरीत्या निकाली काढले.
  • सध्या ३३ संस्थांवर विधी सल्लागार म्हणून कार्यरत आहेत.

पुरस्कार आणि सन्मान:

  • स्व. ॲड. सह. वि. ठोकळ पुरस्कार
  • मराठा सेवा संघाचा जिजाऊ पुरस्कार

 कुटुंब आणि सामाजिक कार्य:

वकिली व्यतिरिक्त त्यांनी सामाजिक कार्यातही योगदान दिले असून एक आदर्श माता म्हणून कुटुंबाची जबाबदारी यशस्वीपणे पार पाडली आहे.