दराशा नागरी आरोग्य केंद्र व प्रसुतीगृहाचे नूतनीकरण काम अंतिम टप्यात...

सोलापूर : सोलापूर महानगरपालिका अंतर्गत कार्यरत दराशा नागरी
आरोग्य केंद्र व प्रसुतीगृहाचे नूतनीकरण बालाजी अमाईन्स स्पेशलिटी केमिकलस
लिमिटेड सोलापूर यांच्याकडून यांचेकडील सीएसआर फंडामधून रक्कम रुपये 1कोटी निधीतून नूतनीकरण करण्यात येणार असून या इमरातीचे पाहणी आज आयुक्त
शीतल तेली -उगले यांनी केली यावेळी बालाजी आमाईन्स चे व्यवस्थापकीय संचालक श्री
राम रेड्डी,उपआयुक्त आशिष लोकरे, नगर
अभियंता सारिका आकूलवार, विभागीय अधिकारी महेश क्षीरसागर,विद्यतू विभागाचे राजेश परदेशी,मल्लीनाथ बिराजदार,वैद्यकीय अधिकारी आतिश बोराडे,शशिकांत चिंचोळी,प्रसाद सांजेकर आदी मान्यवर उपस्थिती होते.बालाजी अमाईन्स स्पेशलिटी
केमिकलस लिमिटेड यांचेकडील रक्कम रुपये 1.00 कोटी निधीतून
प्रसुतीगृहाकरिता अद्ययावत व सुसज्य शस्त्रक्रिया गृह करिता लागणारी सर्व अद्ययावत
उपकरणे, स्वतंत्र व सुसज्य प्रसूतीगृह, प्रसुत नवजात शिशु करिता स्थिरीकरण कक्ष, जोखीमग्रस्त
व अति गंतागुतीच्या गरोदर मानांकरिता अतिदक्षता विभाग तसेच प्रसुतपूर्व
तपासणीकरिता येणा-या गर्भवती मातांना सुसज्य प्रतिक्षालय तसेच प्रसुत पूर्व
तपासण्या यामध्ये सोनोग्राफी, प्रयोगशाळा तपासण्या इ. उपलब्ध
करुन देण्यात येणार आहे.प्रसुतीगृहाकरिता 24 तास विद्युत
सेवा उपलब्ध रहावी याकरिता स्वतंत्र डिझेल जनरेटर तसेच रुग्णांसाठी शुद्ध
पिण्याच्या पाण्याची अंघोळीसाठी गरम पाण्याची व्यवस्था व रुग्णांना उद्वाहन
(लिफ्ट) सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.या प्रसुतीगृहामध्ये महिलांकरिता व
गरोदर मातांकरिता महिलांच्या आरोग्य विषयक सेवांची मोफत सुविधा उपलब्ध करून
देण्यात येणार आहे.त्या अनुषंगाने आज पाहणी केली असून उर्वरित कामे लवकर पूर्ण
करण्याचे सूचना महापालिका आयुक्त शीतल तेली -उगले यांनी अधिकाऱ्याना दिल्या.