महाकुंभमेळाव्यात विक्रमी गर्द्दी

प्रयागराज: प्रयागराज येथील महाकुंभमेळ्यात भाविकांची गर्दी वाढतच
आहे. महाकुंभमेळ्यातील गर्दी पाहून
प्रशासन सतर्क झाले आहे. खबरदारी म्हणून प्रयागराज संगम रेल्वे स्थानक १४
फेब्रुवारीपर्यंत बंद केले आहे. दरम्यान, प्रयागराजमध्ये प्रचंड वाहतूक कोंडी झाली
आहे. यामुळे भाविकांना त्रिवेणी संगमावर पवित्र स्नान करण्यासाठी वेळेवर पोहोचता
आलेली नाही. गर्दीमुळे प्रयागराज संगम रेल्वे स्थानकही शुक्रवारपर्यंत बंद
ठेवण्यात आले आहे. मध्य प्रदेशातील मैहर येथील पोलिसांच्या माहितीनुसार, प्रयागराजकडे जाणे अशक्य झाले आहे. कारण तिथे २०० ते ३०० किमी वाहतूक ठप्प
झाली आहे. प्रयागराजकडे जाणाऱ्या मार्गावर शेकडो किलोमीटर लांब वाहनांचा रांगा
लागल्या आहेत. यामुळे महाकुंभमेळ्याला जाणारे हजारो भाविक महामार्गावर अडकून पडले
आहेत. दरम्यान, १३ जानेवारी रोजी सुरू झालेल्या महाकुंभात
आतापर्यंत ४३ कोटी भाविकांनी संगमात पवित्र स्नान केले आहे.