चित्तौडगडमधील सांवालिया सेठ मंदिरात रेकॉर्डब्रेक देणगी – २८ कोटींचा आकडा पार

चित्तोडगड (राजस्थान) :-
राजस्थानच्या मेवाड परिसरातील श्रद्धेचं प्रतीक असलेल्या भगवान श्री सांवालिया सेठ मंदिरात यंदा देणगीचा नवा विक्रम प्रस्थापित झाला आहे. मंदिर प्रशासनाने २३ जुलै ते १ ऑगस्टदरम्यान ६ टप्प्यांत देणग्यांची मोजणी केली असून, त्यात रु.28 कोटी ३२ लाख ४५ हजार ५५५ रोकड, १ किलो ४४३ ग्रॅम सोने, आणि २०४ किलो चांदी जमा झाली आहे.

६ टप्प्यांतील देणगी मोजणी:

  • १ टप्पा: ₹७.१५ कोटी
  • २ टप्पा: ₹३.३५ कोटी
  • ३ टप्पा: ₹७.६३ कोटी
  • ४ टप्पा: ₹३ कोटी
  • ५ टप्पा: ₹88.65 लाख
  • ६ टप्पा: ₹20.85 लाख
  • एकूण: ₹28.32 कोटी
  • रोकड:
    • भांडारगृहातून – २२.२२ कोटी
    • दान कक्षातून – ६.०९ कोटी
  • सोने:
    • भांडारगृह – ४१० ग्रॅम
    • दान कक्ष – १ किलो ३३ ग्रॅम
  • चांदी:
    • भांडारगृह –80.5 किलो
    • दान कक्ष – १२४ किलो

भाविकांची गर्दी व धार्मिक महत्त्व

मोजणी कृष्ण पक्ष चतुर्दशीपासून सुरू झाली होती आणि हरियाली अमावस्या व रविवारी गर्दीमुळे काही वेळ थांबवावी लागली. या काळात देशभरातून हजारो भाविकांनी श्री सांवालिया सेठचे दर्शन व दान करण्यासाठी मंदिरात हजेरी लावली.
मंदिराची लोकप्रियता व भक्तांचा विश्वास या रेकॉर्डब्रेक देणगीमुळे पुन्हा अधोरेखित झाला आहे.