रतन टाटा यांच्या मृत्युपत्राची माहिती समोर; 3,800 कोटींच्या संपत्तीचे वितरण जाहीर

लहान कर्मचारी व मदतनीसांसाठी मोठी
तरतूद
भारतीय उद्योगपती रतन टाटा यांच्या मृत्युपत्रात त्यांच्या ₹3,800
कोटींच्या संपत्तीचे कसे वितरण करण्यात
आले याची माहिती समोर आली आहे. त्यांनी घरगुती नोकर, कार्यालयीन कर्मचारी आणि जवळच्या व्यक्तींना उदार मदत केली आहे.
वृत्तानुसार, रतन टाटा यांच्या स्वयंपाकी राजन शॉ
यांना ₹1 कोटींची मदत देण्यात आली असून,
त्यांचे ₹51 लाखांचे कर्ज माफ करण्यात आले आहे. त्यांच्या बटलर सुब्बैया कोनार यांना ₹66 लाख, सेक्रेटरी दिलनाज गिल्डर यांना ₹10 लाख तर शिपाई गोपाल सिंग आणि पांडुरंग गुरव
यांना प्रत्येकी ₹50,000 देण्यात आले आहेत.
🔹 पाळीव
कुत्र्यासाठीही आर्थिक तरतूद
रतन टाटा यांचे पाळीव कुत्रे टिटो याच्या देखभालीसाठी ₹12
लाखांची विशेष तरतूद करण्यात आली असून, प्रत्येक
तिमाहीत ₹30,000 याप्रमाणे रक्कम वितरित केली जाणार आहे.
🔹 नो-कॉन्टेस्ट
क्लॉजचा समावेश
रतन टाटा यांच्या मृत्युपत्रात 'नो-कॉन्टेस्ट
क्लॉज' ठेवण्यात आला आहे, ज्यामुळे
कोणत्याही लाभार्थ्याने मृत्युपत्राला आव्हान दिल्यास त्याचा वारसाहक्क रद्द होईल.
🔹 टाटा ट्रस्टसाठी
सर्वाधिक संपत्ती
रतन टाटा यांनी त्यांच्या संपत्तीपैकी मोठा वाटा टाटा ट्रस्टसाठी
ठेवला असून, त्यांच्या दोन मुख्य ट्रस्टना
पुढीलप्रमाणे वाटणी करण्यात आली आहे:
- रतन
टाटा एंडोमेंट फाउंडेशन (RTEF)
- 70% संपत्ती
- रतन
टाटा एंडोमेंट ट्रस्ट (RTET)
- 30% संपत्ती