विजयपूरात रंगली बहुभाषिक काव्यं मैफील; करामसापच्या विजयपूर जिल्हा शाखेकडून अ.भा.साहित्य संमेलन पूर्व उपक्रम

विजयपूर : कर्नाटक राज्य मराठी साहित्य परिषदेच्या विजयपूर जिल्हा शाखेकडून शहरातील हॉटेल भवानी सभागृहात आयोजित पहिल्याच बहुभाषिक काव्यं मैफीलीने रसिक श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. प्राचार्य डॉ एस.जे.जहागिरदार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या आयोजित या बहुभाषिक कविसंमेलन सहभागी १८ कविंनी मराठी, कन्नड, हिंदी, उर्दु, इंग्रजी अशा २४ कविता सादर केल्या.या बहुभाषिक बहुतांश कविंनी सामाजिक एकात्मतेला प्राध्यान्य देणारा व सामाजिक वैग्युन्यावर फटकारे मारणारा कविता सादर करीत श्रोत्यांमधून वाहव्वा मिळविली. कर्नाटक राज्य मराठी साहित्य परिषद विजयपूर जिल्हा अध्यक्ष दिपक शिंत्रे यांचा अध्यक्षतेखालील झालेल्या या कार्यक्रमाचे उद्घाटन कर्नाटक राज्य मराठी साहित्य परिषद कलबुर्गी राज्य अध्यक्ष व अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे उपाध्यक्ष गुरेय्या स्वामी यांचा हस्ते करण्यात आले. याप्रसंगी व्यासपीठावर करामसापचे राज्य कार्यवाह प्रभाकर सलगरे, बागलकोट करामसाप जिल्हाध्यक्षा सौ सुधा बेटगेरी विजयपूर जिल्हा उपाध्यक्ष डॉ सदाशिव पवार, चिकोडी जिल्हा अध्यक्षा लता माने उपस्थित होते. कन्नड नाड गीत व सरस्वती स्तवनाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. या प्रसंगी बोलताना करामसाप राज्य अध्यक्ष गुरय्या स्वामी यांनी अलिकडे वेगाने सुरू असलेल्या परिषदेच्या साहित्य व सांस्कृतिक विषयक उपक्रमांची माहिती देत करामसाप कसलाही भेदभाव बाळगला जात नाही व नव साहित्यिक व कविंना हक्काचे व्यासपीठ मिळवून दिले जाते असे नमूद केले. यावेळी प्रमुख पाहुण्यासह करामसाप विजयपूर जिल्हाध्यक्ष दीपक शिंत्रे, डॉ. सदाशिव पवार उपाध्यक्ष, कन्हैया पेठकर कार्यवाह, प्रा. गंगाधर गेंड. सहकार्यवाह श्री.सुधाकर शिंदे खजिनदार डॉ. एस.जे. जहागिरदार श्रीपाद पाटणकर,सौ. रुपा हिबारे, ,प्रा. उल्का जाधव या पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कन्हैया पेठकर तर बहुभाषा कविसंमेलनाचे सूत्रसंचालन मारुती तरसे यांनी केले.
विजयपूर. दीपक शिंत्रे