राजा रघुवंशी हत्या: पत्नी सोनमसह चार जण अटकेत, पूर्वनियोजित कटाचा संशय

इंदूरमधील नवविवाहित राजा रघुवंशी याच्या हत्येप्रकरणी त्याची पत्नी सोनम रघुवंशीला पोलिसांनी अटक केली असून, मेघालय पोलिसांना तिची तीन दिवसांची ट्रान्झिट रिमांड मिळाली आहे. ANIने दिलेल्या माहितीनुसार, सोनमला उत्तर प्रदेशातील गाझीपूर येथून अटक करण्यात आली. राजा आणि सोनम २२ मे रोजी मेघालयमधील शिलाँग येथे हनिमूनसाठी गेले होते. २३ मे रोजी संध्याकाळपासून त्यांचा कुटुंबाशी संपर्क तुटला. त्यांची भाड्याने घेतलेली स्कूटर एका कॅफेजवळ बेवारस अवस्थेत सापडली. त्यानंतर पोलिसांनी शोधमोहीम सुरू केली. २ जून रोजी राजा रघुवंशीचा मृतदेह चेरापुंजीजवळील २०० फूट खोल दरीत झाडाला लटकलेल्या अवस्थेत सापडला. घटनास्थळी रक्ताने माखलेला चाकू, सोनमचा रेनकोट, औषधाच्या पट्ट्या, मोबाईल स्क्रीनचा भाग व स्मार्टवॉच आढळले. या पुराव्यांवरून पोलिसांनी हत्या झाल्याचा निष्कर्ष काढला. मेघालय पोलिसांनी केलेल्या तपासात सोनम रघुवंशीसह इतर तिघांची गुंतवणूक उघडकीस आली. पोलिसांच्या माहितीनुसार, हे संपूर्ण प्रकरण पूर्वनियोजित कट होता. सोनमने आत्मसमर्पण केल्यानंतर तिला ताब्यात घेण्यात आले.

राजा रघुवंशी हत्या प्रकरणातील प्रमुख घडामोडी :

  • २२ मे : दाम्पत्य मेघालयच्या मावलाखियात पोहोचले
  • २३ मे : संपर्क तुटला, स्कूटर बेवारस अवस्थेत सापडली
  • २७ मे : एमपीचे मुख्यमंत्री मोहन यादव यांनी मेघालय सीएमशी संपर्क साधला
  • २ जून : मृतदेह सापडला
  • ४ जून : घटनास्थळी महत्त्वाचे पुरावे सापडले
  • ६ जून : सीसीटीव्ही फुटेजमध्ये दोघे शेवटचे दिसले
  • ९ जून : सोनमसह अन्य तिघांना अटक
  • १० जून : पोलिसांना तीन दिवसांची ट्रान्झिट रिमांड मंजूर

या प्रकरणातील पुढील तपास सुरु असून, मेघालय पोलिस लवकरच सोनम आणि अन्य आरोपींचा आणखी सखोल तपास करणार आहेत.