राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंना युतीचा प्रस्ताव? महेश मांजरेकर यांच्या दाव्याने खळबळ

मुंबई : राज्याचा राजकारणाला आणि मराठी अस्मितेला कलाटणी देणाऱ्या राजकीय वळणाचे संकेत राज ठाकरे यांनी डोळे आहेत. महाराष्ट्राच्या हितासाठी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी एकत्र यावे ही अनेकांची इच्च्या पूर्ण होण्याचे संकेत आहेत. महेश मांजरेकर यांच्या दाव्याने खळबळ उडाली आहे,  राज्याच्या राजकारणातून एक सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांना युतीसाठी प्रस्ताव पाठवला आहे. महाराष्ट्राच्या अस्तित्वासाठी एकत्र येण्यामध्ये काही चुकीचे नाही, असं म्हणत उद्धव ठाकरेंना राज ठाकरे यांनी युतीचा प्रस्ताव पाठवला आहे. महेश मांजरेकर यांना ‘वास्तव में Truth’ या दिलेल्या मुलाखतीत राज ठाकरे यांनी याबाबतची माहिती दिली. मराष्ट्रातील ठाकरे बंधू अर्थात राज आणि उद्धव एकत्र येणार का? असा सवाल गेल्या अनेक वर्षांपासून विचारला जात आहे. सध्याच्या किचकट राजकीय समीकरणात आता राज आणि उद्धव एकत्र यावेत, अशी इच्छा व्यक्त केली जात असताना आता राज ठाकरे यांनी दिलेल्या एका मुलाखतीत मोठं वक्तव्य केलं आहे. आमच्यातील वाद, भांडणं छोटी आहेत. महाराष्ट्र खूप मोठा आहे, त्यासाठी एकत्र यायला हरकत नाही, असं राज ठाकरे यांनी मुलाखतीत म्हटले आहे. पुढे बोलताना राज ठाकर म्हणाले, कुठल्याही गोष्टीसाठी आमच्यातले वाद भांडण किरकोळ, महाराष्ट्र खूप मोठा आहे. या महाराष्ट्राच्या अस्तित्वासाठी आहे. मराठी माणसाच्या अस्तित्वासाठी बाकी सगळ्या गोष्टी शुल्लक आहेत. आपण लार्जर पिक्चर बघणं गरजेचं आहे, एकत्र येणं आणि एकत्र राहणं फार कठीण आहे, असं मला वाटत नाही. माझ्या इच्छेचा आणि स्वार्थाचा प्रश्न नाही, असं राज ठाकरे यावेळी म्हणाले. यावर आता उद्धव ठाकरेंकडून काय प्रतिक्रिया येतेय, याकडे सर्वांच्या नजरा खिळल्या आहेत.