हिमाचल प्रदेशात पावसाचा हाहाकार

शिमला : हिमाचल प्रदेशात जोरदार पाऊस आणि ढगफुटीमुळे हाहाकार माजला आहे. या नैसर्गिक प्रलयात गेल्या दोन आठवड्यात (२० जून ते ३ जुलै दरम्यान) किमान ६९ लोक दगावले आहेत. ४०० कोटी रुपयांपेक्षा जास्त मालमत्ता धुळीस मिळाल्या आहेत. मंडी जिल्ह्यात १६ ठिकाणी ढगफुटी झाली आहे, तर ३ वेळा पूर आला आहे. परिणामी अनेक घर जमीनदोस्त झाली आहेत. तर गाड्या पाण्यात वाहून गेल्या आहेत. युद्धपातळीवर बचावकार्य सुरु आहे.हवामान विभागाने (IMD) ७ जुलैपर्यंत हिमाचल प्रदेशात मुसळधार पावसाचा अलर्ट जारी केला आहे. यामुळे पुन्हा भूस्खलन होण्याची शक्यता बळावली आहे. राज्यात ४०० रस्ते बंद आहेत, ५०० पेक्षा जास्त वीज रोहित्र (power transformers) बंद पडले आहेत. जवळपास ७०० पिण्याच्या पाण्याच्या योजना विस्कळीत झाल्या आहेत. यामुळे लोकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. हवामान बदलामुळे हे संकट ओढवले आहे, असे अधिकाऱ्यांनी नमूद केले आहे संचार सध्या बचाव आणि मदतकार्य युद्धपातळीवर सुरू आहे. एनडीआरएफ, एसडीआरएफ, होमगार्ड, लष्कर स्थानिक पोलीस आणि इतर केंद्रीय संस्था सर्व प्रयत्न पणाला लावून मदत करत आहेत. एका स्थानिक व्यक्तीने सांगितले, 'ढगफुटीमुळे सगळं काही वाहून गेलं आहे.'पाऊस आणि पुरामुळे लोकांना खूप त्रास होत आहे. सरकार आणि बचाव पथके लोकांना मदत करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत. लोकांना सुरक्षित राहण्याचा आणि हवामान खात्याच्या इशाऱ्याप्रमाणे खबरदारी बाळगण्याच सल्ला देण्यात आला आहे. जर कोणी अडचणीत असेल, तर त्याला मदत करा. लोकांना सतर्क राहण्याचा आणि सुरक्षित राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे. संचार