राहुल गांधींवर अविश्वास दाखवण्यात येत आहे.

नवी दिल्ली, दि. १०-

राजधानी दिल्लीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाची महत्त्वाची बैठक शरद पवारांच्या उपस्थितीत पार पडली. या बैठकीला विधानसभेत पराभूत झालेले शरद पवार गटासह मविआतील बहुतांश उमेदवार उपस्थित होते. विधानसभेचे निकाल आणि त्यामधून समोर आलेले आकडे या पार्श्वभूमीवर ही बैठक आयोजित करण्यात आली होती. इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीन (ईव्हीएम) सह विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने संशयास्पद वाटत असलेल्या बाबींवर या बैठकीत चर्चा झाली. कायदेशीर मार्ग म्हणून या सर्व विषयांवर सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्याची शक्यता याबद्दलही चर्चा झाली. ज्येष्ठ काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनीही शरद पवारांची भेट घेतली. राज्यात विधानसभा निवडणूक पार पडली. या निवडणुकीत महाविकास आघाडीला दारुण पराभवाला सामोरे जावे लागले. मात्र, विधानसभा निवडणुकीच्या

निकालावर महाविकास आघाडीने अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. मतदार यादीतील घोळ, अचानक वाढलेली मते, आकडेवारी यावर महाविकास आघाडी मंथन करत आहे. या बैठकीला माळशिरस विधानसभा मतदारसंघाचे आम दार उत्तमराव जानकर हेदेखील उपस्थित होते.


शरद पवारांकडे नेतृत्व बदलण्यावर चर्चा

 शरद पवार यांच्या घरी ईव्हीएमबाबत बैठक होत नाही तर राहुल गांधी यांचे नेतृत्व बदलण्यासाठी होत आहे, राहुल गांधींवर अविश्वास दाखवण्यात येत आहे. राज्यात जे काही घडले, लोकसभेत जो काही पराभव झाला, यानंतर इंडिया आघाडीला एक नव्या नेतृत्वाची गरज आहे. ममता बॅनर्जी यांच्याकडे नेतृत्व सोपवले जाईल, असे संजय शिरसाट यांनी म्हटले आहे.